शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठा श्रेष्ठ की पैसा याचीच कसोटी...

By admin | Updated: January 29, 2016 00:26 IST

महापौर निवड : पदासाठी दाखविली जात आहेत प्रलोभने; इच्छुकांच्या लॉबिंगपुढे नेते झुकणार का?

शीतल पाटील -- सांगली -महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी सत्ताधारी काँग्रेसमधील इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतींदरम्यान शर्यतीतील उमेदवाराचे नाव घेण्यासाठी नगरसेवकांना प्रलोभने दाखविली जात आहेत. केवळ नाव घेण्यासाठी लाखापासून बोली लावली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष व नेत्यांवरील निष्ठा श्रेष्ठ की पैसा, याची कसोटी लागणार आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी २ फेब्रुवारीरोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. महापौर पदासाठी सत्ताधारी काँग्रेसमधून हारूण शिकलगार, सुरेश आवटी, राजेश नाईक, रोहिणी पाटील, विजय घाडगे, प्रशांत पाटील-मजलेकर, अलका पवार, बसवेश्वर सातपुते, अनारकली कुरणे इच्छुक आहेत. सोमवारी १ फेब्रुवारीरोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. महापौर निवडीचे सर्वाधिकार जयश्रीताई पाटील यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे महापौर पदाचा उमेदवार जयश्रीताईच ठरवतील. यापूर्वी महापौर, उपमहापौर पदापासून ते अगदी विषय समिती सदस्यांच्या निवडी मदनभाऊ पाटील यांच्या आदेशाने होत. त्यांचा शब्द पालिकेच्या राजकारणात कधीच डावलला गेला नाही. पण मदनभाऊंच्या पश्चात अनेक नगरसेवकांना पंख फुटले आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्यातून काँग्रेसअंतर्गत गटबाजीला चांगलेच उधाण आले आहे. इच्छुक नगरसेवकांनी गटा-तटाचे राजकारण सुरू केले आहे. प्रलोभनांच्या जोरावर महापौरपदी विराजमान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. या प्रलोभनाला नवखे नगरसेवक बळी पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या राजकारणात पैशाचा खेळ पहिल्यांदात जोरात सुरू आहे. नेत्यांसमोर गटाचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पैशाची बोली लावली जात आहे. फुटीच्या राजकारणात पक्षाला कोण महत्त्व देतो आणि कोण नाही, याची पुरती कल्पना असलेली काही नेतेमंडळी पालिकेबाहेरून सूत्रे हलवित आहेत. नगरसेवकांची पैशाची नस ओळखून त्यांच्याशी संधान साधले जात आहेत. पैशाचा हा खेळ यापूर्वी कधी फारसा रंगला नव्हता. नेत्यावरील निष्ठा, या निकषावर बहुतांशवेळा पालिकेची सूत्रे नेत्यांनी नगरसेवकांच्या हाती दिली होती. मदनभाऊंनी तर अनेकदा समाजात बदनाम झालेल्यांनाही पदे दिली. कारण ते त्यांच्याशी एकनिष्ठ होते. त्यांच्यापायी अनेकदा मदनभाऊंना टीकेला सामोरे जावे लागले. पण आमची कातडी गेंड्याची आहे, असे म्हणत त्यांनी त्यांचा बचावही केला. पण आता परिस्थिती बदलली आहे. निष्ठेपेक्षा पैसा बोलू लागला आहे. स्वकीयांचा चक्रव्यूह : धोक्याची घंटामहापालिका क्षेत्रात मदन पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. ते आमदार असोत अथवा नसोत, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची फौज मोठी होती. हीच ताकद आता जयश्रीतार्इंच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात महापालिका क्षेत्राचे नेतृत्व जयश्रीतार्इंच्या हाती येणार, हे उघड आहे. पण काहींना ते रुचलेले नाही. आजपर्यंत पालिकेच्या राजकारणापासून दूर राहिलेली नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. त्यासाठी महापौर निवडणूक ही चांगली संधी आहे. काँग्रेस नगरसेवकांत फूट पाडून जयश्रीतार्इंना धक्का देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पूर्वी मदनभाऊंना स्वकीयांसह परकीयांनीही घेरले होते. आता जयश्रीतार्इंना स्वपक्षातील नेत्यांकडूनच त्रास सुरू झाला आहे. स्वकीयांचा हा राजकीय चक्रव्यूह जयश्रीताई कशा भेदतात, यावरच भविष्यातील वाटचाल निश्चित होणार आहे. एकीकडे नगरसेवकांत पैशाचा बाजार सुरू असताना, इतर माध्यमातूनही जयश्रीतार्इंवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी विविध क्लुप्त्याही आखल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू झाले आहेत. अगदी घरातून महापौर पदासाठी लॉबिंग केले जात आहे. मदनभाऊंच्या पश्चात कांँग्रेस एकसंधपणे महापौर निवडीला सामोरी जाईल, असे बोलले जात होते. पण नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षेच्या एकसंधतेलाच तडा दिला आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने जयश्रीतार्इंची कसोटी लागणार आहे. त्या निष्ठेला महत्त्व देतात, की लॉबिंगपुढे झुकतात, हे दोन फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल.