शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कवठेमहांकाळला झेंडा लावण्यावरून तणाव

By admin | Updated: July 8, 2015 23:50 IST

दोन गटात वादावादी : पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

कवठेमहांकाळ : शहरातील युववाणी चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून मंगळवारी रात्री दोन गटात वादावादी झाली. बुधवारी दुपारपर्यंत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे व जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती गजानन कोठावळे, उपसरपंच चंद्रशेखर सगरे, युवराज पाटील यांच्यासह शांतता समितीच्या बैठकीनंतर वातावरण निवळले. दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले. एका कार्यक्रमानिमित्त काही युवकांनी युववाणी चौकातील विजेच्या खांबावर झेंडा लावला होता. सोमवारी दुसऱ्या गटाच्या तीन ते चार तरुणांनी एकत्रित येऊन या झेंड्यापासून काही अंतरावर लाकडी चबुतरा तयार करून त्यावर दुसरा झेंडा लावला. त्यामुळे मंगळवारी रात्री तरुणांच्या दोन गटात वादावादी झाली. वादावादी सुरू झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जलद कृती दलाची एक तुकडीही मागवली. पोलीस बंदोबस्तात दोन्ही झेंडे उतरविण्याचे काम सुरू केले. दुसऱ्यादिवशी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन मोहिते यांनी पडदा टाकला. बुधवारी सकाळी चार तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप करीत एक गट आक्रमक झाला. युवराजअण्णा पाटील, अनिल पाटील, दिलीप गिड्डे यांच्यासह शहरातील व तालुक्याच्या विविध गावांतील तरुण तहसील कार्यालयाच्या आवारात जमा झाले. रात्री मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा शहर बंद करू, असा पवित्रा त्यांनी घेतला. वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी जलद कृती दलाची एक तुकडी मागवली. निरीक्षक मोहिते यांनी म्हसोबा गेटजवळून अनिल पाटील यांना ताब्यात घेतले. हा प्रकार समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे यांनी कवठेमहांकाळमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे, गजानन कोठावळे, उपसरपंच चंद्रशेखर सगरे, युवराजअण्णा पाटील, प्रदीप वाले, गोविंद पाटील, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर पाटील, प्रदीप शिंदे, अनिल पाटील, दिलीप गिड्डे, संजय चव्हाण, मोहन पाटील, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांच्यासह दोन्ही गटातील प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत विनापरवाना झेंडे लावणारे आणि पोलीस बंदोबस्तात झेंडे उतरविण्याचे काम सुरू असताना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोठावळे यांनी केली. बनसोडे यांनी त्याचे आदेश पोलीस निरीक्षक मोहिते यांना दिले. त्यानंतर युवराज पाटील यांनी युवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दुपारनंतर पोलीस, शांतता समिती व नागरिक यांच्यातही बैठक झाली. त्यानंतर शहरातील तणाव पूर्ण निवळला. (वार्ताहर)युवराज मोहिते यांची बदलीकाही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले येथील पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांची अखेर सांगली मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीच्या वृत्तानंतर कवठेमहांकाळ शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला. युवराज मोहिते यांनी १० जून २०१४ रोजी कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात जवळपास सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारींचा भडीमार केला होता. गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले होते. मागील महिन्यात सर्वपक्षीय आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मोहिते यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.