शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

पाणी कनेक्शनसाठी दहा हजार!

By admin | Updated: April 24, 2015 01:16 IST

स्थायी समिती सभेत आरोप : प्लंबर एजन्सीचा प्रस्ताव फेटाळला

सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील खाबूगिरीचा गुरुवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी पर्दाफाश केला. राष्ट्रवादीचे विष्णू माने, शेडजी मोहिते या सदस्यांनी पाणी कनेक्शनसाठी दोन हजार रुपये खर्च येत असताना, चार हजारांपासून दहा हजारांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. नागरिकांची लूट सुरू असताना सत्ताधारी मात्र डोळे झाकून गप्प असल्याचा आरोप केला. प्लंबिंगच्या कामासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा डावही त्यांनी हाणून पाडला. सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत पाणीपुरवठा विभागाकडील प्लंबिंगच्या कामासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा विषय प्रशासनाने चर्चेसाठी आणला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला. विष्णू माने म्हणाले की, पाणी कनेक्शनसाठी डिपॉझिट ७५० रुपये, मीटर ८५० रुपये, खुदाई १५० व इतर खर्च, असे सुमारे दोन हजार रुपये नागरिकांना मोजावे लागतात. परंतु, पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून चार हजारांपासून दहा हजारांपर्यंत पैसे उकळले जातात. त्यात पुन्हा एजन्सी नियुक्त केल्यास प्लंबिंगच्या कामातून खाबूगिरी वाढणार आहे. पाणीपुरवठ्याच्या कारभारावर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा विस्कळीत झाली आहे. केवळ देव-घेवीचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्लंबिंग एजन्सीचा विषयही त्यांनी हाणून पाडला. मिरजेत पंढरपूर रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलसमोरील नाल्यात एका बिल्डरने अपार्टमेंटचे काम सुरू केले आहे. त्याबाबत शिवाजी दुर्वे यांनी प्रश्न उपस्थित केला. सभापती मेंढे यांनी तातडीने स्थळ पाहणी करून, बिल्डरला चुकीच्या पद्धतीने परवाना दिला असेल, तर तो रद्द करण्याची सूचना सहायक आयुक्तांना केली. दिवाबत्ती साहित्य पुरवठ्याची ८४ लाखांची निविदा मंजूर केली आहे; पण ठेकेदारांकडून साहित्यपुरवठा होत नाही. आठ दिवसांपेक्षा अधिक काळ शहर अंधारात आहे, असे माने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सफाईव्यतिरिक्त अन्य ठिकाणी काम करणाऱ्या मानधनावरील २३ कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे आदेशही सभापतींनी दिले.