शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

दहा हजार गुंतवणूकदार; ५५० कोटींचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:32 IST

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘महारयत’कडून साडेपाचशे कोटींची टोपी घालून घेणारे आठ-दहा हजार हतबल गुंतवणूकदार, खाद्य-लसींअभावी ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘महारयत’कडून साडेपाचशे कोटींची टोपी घालून घेणारे आठ-दहा हजार हतबल गुंतवणूकदार, खाद्य-लसींअभावी तडफडणाऱ्या कडकनाथ कोंबड्या, नासलेली-पुरून टाकली जात असलेली अंडी... हे चित्र एकीकडे, तर आपण कसे अडकणार नाही याची तजवीज करण्यात व्यस्त असलेले नेते, भांडणारी दोन-चार डोकी, सोयीस्कर मौन घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागलेले लोकप्रतिनिधी... हे चित्र दुसरीकडे. या पार्श्वभूमीवर ‘कडकनाथ’चा शेवट काय-कसा होणार, गुंतवणूकदारांना पैसा परत मिळणार की नाही, हे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत.कडकनाथ कोंबड्यांच्या कोणत्याच शेडवर दोन-तीन महिन्यांपासून खाद्य नाही. परिणामी कोंबड्या एकमेकींना टोचा मारत किलकिलाट करत असलेल्या दिसतात. खाद्य-लसीअभावी मर होऊ लागल्याने शेड ओकीबोकी पडत आहेत. उठाव नसल्याने वास मारत पडलेली चार-चार हजार अंडी पुरून टाकली जात आहेत.‘महारयत’साठी लोकांना भुलवणारे, स्वत:ची हमी देणारे युवा नेते आता नामानिराळे झाले आहेत. ‘कडकनाथ’मध्ये आपण कसे अडकणार नाही याची तजवीज करण्यात ते, त्यांचे तारणहार मायबाप व्यस्त आहेत. हा गोरखधंदा समजत असूनही या नेतेमंडळींनी सुधीर आणि संदीप मोहितेची पाठराखण केली. मार्केटिंग करणाºया टीमला ‘मोटिव्हेशनल लेक्चर्स’ देण्यापासून, लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यापर्यंत काही युवा नेते जातीने लक्ष देत होते. स्वत: शब्द टाकत होते म्हणे! त्यांचा आणि गंडा घालणाऱ्यांचा धंदा परस्परपूरक. गंडा घालणाºयांना यांचं वलय-बॅकिंग मिळायचं, तर यांना मानसन्मान आणि अप्रत्यक्ष वाटा...नाना उद्योग करणाºया सुधीर मोहितेने आध्यात्मिक प्रवचनेही दिली आहेत! तो आणि संदीप दोघेही गोड बोलण्यात पटाईत. पोल्ट्री शेड भाड्याने घेण्याच्या धंद्यातून दोघांची गणेश शेवाळेशी मैत्री झाली आणि दोघे शेतकरी संघटनेतील नेत्यांच्या संपर्कात आले. याच संघटनेच्या इस्लामपुरातील युवा नेत्याशी ऊठबस वाढली. यातून संदीप संघटनेचा पदाधिकारी झाला. ‘रयत अ‍ॅग्रो’ची संकल्पना तेव्हाचीच. संघटनेचे आणि कंपनीचे नाव एकच. हा निव्वळ योगायोग बरे! रयत अ‍ॅग्रोची महारयत अ‍ॅग्रो बनलेल्या कंपनीच्या पुणे, औरंगाबादसह इतर कार्यालयांच्या उद्घाटनाला या युवा नेत्यांची उपस्थिती होती. त्यांचे नेहमीच रयत आणि महारयतच्या कार्यालयांमध्ये येणेजाणे होते. पैसे भरण्यासाठी-करार करण्यासाठी आलेल्यांना ते आणखी पैसे गुंतवण्यास सांगत. त्यावर स्वत:ची हमी देत! विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, पै-पाहुण्यांनीही ‘कडकनाथ’वर पैसा लावला. ‘महारयत’मध्ये सर्वाधिक गुंतवणूक कुणाची असेत, तर ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची!आता याविरोधात लढा उभा राहतोय. नागवलेल्या शेतकºयांच्या बाजूने काहीजण नेटाने उभे आहेत. ‘कडकनाथ’मध्ये बड्या नेत्यांचा हात असल्याचे दिसू लागल्याने काहींची गोची झाली आहे. मूग गिळून ते गप्प आहेत! तर काही ‘चाणक्य’ सोयीस्कर मौन घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांना हातमिळवणी करायची असावी... ‘कडकनाथ’चा शेवट काय-कसा होणार, गुंतवणूकदारांना पैसा परत मिळणार की नाही, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहत आहेत.‘महारयत’चे लागेबांधे आणि काही प्रश्न...फर्डे बोलणे, छाप पाडणारे व्यक्तिमत्व पाहूनच बड्या नेत्यांनी संदीप मोहितेला त्यांच्या संघटनेच्या युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष केले. त्याची ऊठबस त्यांच्यातच असायची. मग त्याच्यासोबत फिरणाºयांना त्याचे उद्योग माहीत नव्हते काय?युवा नेत्यांची संघटनेतील लाखो-हजारो कार्यकर्त्यांसारखी सुधीर-संदीप मोहितेसोबत नुसतीच ओळख नव्हती, तर कमालीची घसट होती. मोहितेंच्या घरगुती कार्यक्रमांना जातीने हजेरी, त्यांच्यासोबत कुटुंबासह पर्यटनाचा आनंद, ‘महारयत’च्या कार्यालयांचे स्वहस्ते उद्घाटन, त्या कार्यालयांतील नेहमीचा वावर या युवा नेत्यांना ‘क्लीन चिट’ देईल काय?गुंतवणूकदार पैसे देत असताना, करार करत असताना तेथे असलेली युवा नेत्यांची उपस्थिती, पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे या गोरखधंद्यातील त्यांचा वाटा अधोरेखित करत नाही का?बक्कळ धंदा करणाºया एजंट, डिलरना परदेशी दौरे, बक्षिसे देण्याचा फंडा विविध कंपन्या अवलंबत असतात. ‘महारयत’नेही काहींना परदेशी दौरा घडवून आणला. त्यात हे नेतेही सहभागी झाले नव्हते काय?