शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बागेवाडीत डेंग्यूचे दहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

जत : बागेवाडी (ता. जत) येथे डेंग्यू साथीने थैमान घातले असून डेंग्यूमुळे सोपान बापू वाघमारे (वय ८२) यांचा तीन ...

जत : बागेवाडी (ता. जत) येथे डेंग्यू साथीने थैमान घातले असून डेंग्यूमुळे सोपान बापू वाघमारे (वय ८२) यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला, तर आणखी दहाजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यापैकी सारिका वाघमारे (३२) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा व प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

बागेवाडी येथे मागील दहा दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू आहे. डेंग्यूमुळे सोपान बापू वाघमारे या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर गावातील सारिका वाघमारे, अभिजित तुपसौंदर्य (३०), अभिषेक तुपसौंदर्य (३२), स्वाती वाघमारे (२५), शांता वाघमारे (५०) यांच्यासह आणखी नऊजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यापैकी सारिका वाघमारे यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गावात डेंग्यूची साथ सुरू असताना बागेवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य आणि ग्रामसेवक मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. धूर फवारणी करण्यात आली नाही, यंत्र बंद पडले आहे, असे ग्रामसेवक बालम मुजावर सांगत आहेत. डेंग्यूवर शासकीय रुग्णालयातून मिळणारे औषधोपचार प्रभावी ठरले आहेत. परंतु कोरोना संसर्गामुळे डेंग्यू रुग्णावर उपचार होत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. गावात साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आणखी काहीजणांना थंडी आणि तापाची लक्षणे दिसत आहेत. आरोग्य विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून घरोघरी फिरून आरोग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्या अर्चना पाटील व सामाजिक कार्यकर्ते नाथा पाटील यांनी केली आहे.