शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने टेम्पोला आग

By admin | Updated: October 17, 2016 00:35 IST

विटा येथे दुर्घटना : तीन ते चार लाखांची हानी; टेम्पोसह कांद्याचे नुकसान

विटा : घोडेगाव (जि. अहमदनगर) येथून इचलकरंजी बाजारपेठेत कांदा घेऊन निघालेल्या मालवाहू टेम्पोला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत टेम्पोची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली, तर कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विटा शहरापासून तीन किलोमीटरजवळ तासगाव रस्त्यावरील गांधीनगर येथे घडली. पारनेर (जि. अहमदनगर) येथील पंडित मोहन म्हेत्रे यांच्या मालकीचा टेम्पो (क्र. एमएच १६, एवाय २०७०) चालक विजय विष्णू गाडे (रा. पारनेर) घेऊन इचलकरंजीकडे चालला होता. या टेम्पोत कांदा भरण्यात आला होता. टेम्पो विटा-तासगाव रस्त्यावरील गांधीनगर फाट्याजवळ आला असता, बॉनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन तो खाली उतरला. तेवढ्यात टेम्पोच्या केबिनने पेट घेतला. टेम्पोपासून जवळच काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. विटा-तासगाव या प्रमुख मार्गावर ही घटना घडल्याने वाहनधारकांची प्रचंड धावपळ उडाली. या घटनेची माहिती विटा पोलिस व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विटा पोलिसांनी या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद केल्याने सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली. या आगीत टेम्पोचे पुढील दोन टायर, इंजिन, केबीन आणि छतावरील ताडपदरी पूर्णपणे जळून खाक झाली. टेम्पोतील कांद्याला उष्णता लागल्याने आणि आग विझविताना कांद्यात पाणी गेल्याने कांदाही खराब झाला. या घटनेत सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (वार्ताहर)