शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या गैरव्यवस्थापनाने ‘ताकारी’ बंद

By admin | Updated: April 19, 2016 00:56 IST

गरजेपेक्षा जादा पाणीसाठा : ‘ताकारी’ची पाणी पातळी खालावली

प्रताप महाडिक--कडेगाव -टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे ताकारी योजना अचानक बंद झाली. चालूवर्षी सलग तिसऱ्या आवर्तनालाही असा प्रकार घडल्यामुळे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील टेंभू येथील पाणी साठवण बंधाऱ्यात गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून टेंभूच्या अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवले आहे. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे ताकारी उपसा सिंचन योजना अचानकपणे रविवारी सायंकाळी पाच वाजता बंद पडली.ताकारी व टेंभू या दोन्ही सिंचन योजनांसाठी कोयना धरणातून पाणी सोडले जाते. ताकारी तसेच टेंभू योजना आणि कृष्णा नदीवरील अन्य सर्व पाणी वितरण व व्यवस्थापनाचे अधिकार सांगली पाटबंधारे विभागाकडे दिले आहेत. ताकारी व टेंभू या दोन्ही योजना आवर्तनासाठी आवश्यक पाणी मागणी सांगली पाटबंधारे विभागाकडे करतात. योजनांच्या मागणीप्रमाणे सांगली विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडले जाते. सोडलेले पाणी प्रथम टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील पाणी साठवण बंधाऱ्यात जाते. टेंभू बंधाऱ्यात गरजेप्रमाणे आवश्यक पाणी पातळी ठेवून ताकारी तसेच कृष्णा नदीवरील अन्य उपशासाठी जादा आलेले पाणी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या साठवण बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पुढे सोडणे गरजेचे आहे. तशा सूचना सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारीने देतात. यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक पाणीसाठा या योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात होतो. परंतु सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन न करता टेंभू योजनेचे अधिकारी आवश्यकतेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. यामुळे ताकारी योजनेला आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर पाणी पातळी साटपेवाडी बंधाऱ्यात मिळत नाही. काल, रविवारी सायंकाळी पाच वाजता ताकारी योजनेची पाणी पातळी खालावली आणि योजना बंद पडली. मागील दोन्ही आर्वतनातही अशाप्रकारे ताकारी योजना बंद पडली, याला टेंभूचे गैरव्यवस्थापनच कारणीभूत आहे.ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊन महिना झाला. ताकारीचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यातील विसापूरच्या जवळपास पोहोचले होते. आता योजना अचानक बंद झाली. मुख्य कालवा कोरडा पडला आहे. आता पुन्हा योजना सुरू करून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. या दोन्ही दिवसातील पाण्याचा अपव्यय आणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही न करणाऱ्या टेंभूच्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे. ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभागामार्फत ताकारीची आवर्तने नियमित मिळत असताना आणि पाणीपट्टी वसुली चांगली असताना असे कृत्रिम अडथळे निर्माण होत असल्यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिकारी बेजबाबदार : कारवाईची मागणीऐन दुष्काळात जबाबदारीचे भान ठेवून टेंभूचे अधिकारी काम करीत नाहीत. सांगली विभागाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करीत नाहीत. गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून ठेवत आहेत. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणीपातळी खालावली आणि ताकारी योजना बंद पडली. ही घटना सलग तीन आर्वतनात घडली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.