शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: December 17, 2015 01:22 IST

आंदोलनाचा इशारा : पगार वेळेवर करण्याची शिक्षक संघाची मागणी

सांगली : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. डिसेंबर निम्मा संपला तरीही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. म्हणून शिक्षकांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांची भेट घेतली आहे. जर येत्या दोन दिवसात शिक्षकांचे पगार झाले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे व अविनाश गुरव यांनी दिला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सहा महिन्यांपूर्वी दर महिन्याच्या एक तारखेला पगार होत होते. परंतु, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांचे पगारच वेळेवर होत नाहीत. दोन ते तीन महिने शिक्षकांचे पगार होत नाहीत.बुधवारी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य कार्यकारी पाटील यांची भेट घेऊन पगाराच्या विलंबाबत विचारणा केली. यावेळी पाटील यांनी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांना बोलावून शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याची सूचना केली. यावेळी शिक्षक संघाचे विनायक शिंदे, अविनाश गुरव, हंबीरराव पवार, शशिकांत माणगावे, सलीम मुल्ला, सतीश पाटील, चंद्रकांत कांबळे, महादेव हेगडे, तानाजी खोत, सुनील गुरव आदींनी शिक्षकांच्या पगारासह विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्या, शिक्षकांच्या विविध प्रलंबित बिलासाठी आॅफलाईन पैसे वर्ग करावेत, आंतरजिल्हा बदलीचे ना-हरकत पत्र द्यावे, महापालिका व नगरपालिकेतून जिल्हा परिषदेकडे समायोजनाने आलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ नेमणूक तारखेनुसार सेवाज्येष्ठता ठरविण्यात यावी, आदी मागण्या केल्या. (वार्ताहर)तीव्र असंतोष --निम्मा डिसेंबर संपला तरी, नोव्हेंबर महिन्याचे शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. पगार वेळेवर होत नसल्यामुळे शिक्षकांचे बँकांचे असणारे हप्ते थांबत आहेत. अनेकवेळा दंडही कर्जावर भरावा लागत आहे. यामुळे शिक्षकांतून जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.