शिक्षक समिती बँकेत सत्तेत आल्यानंतर संचालक मंडळाने स्टॅम्प ड्युटी कमी करणे, कायम ठेवी परत देणे, आरटीजीएस, एनईएफटी सुविधा, कर्जदार मृत सभासदांना २० लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर निष्कर्जी सभासदांच्या कुटुंबास ३ लाख रुपयांची आर्थिक मदत असे अनेक सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. कर्जाचा व्याजदर दोन वेळा अर्धा टक्क्यांनी कमी करून डिव्हिडंडही दरवर्षी वाढवत ६ टक्क्यांपर्यंत दिला आहे.
मात्र, वारंवार कर्जाचा व्याजदर अजूनही कमी करावा यासाठी बऱ्याचदा विनंती करूनही एका विशेष व्यक्तीकडून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप खटावकर यांनी केला.
सर्व सभासद बंधू-भगिनींनी बँकेच्या समान हप्त्याच्या कर्जाचा व्याजदर १ अंकी करावा अशी इच्छा व्यक्त केली. कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय आठ दिवसांत न झाल्यास संचालक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा खटावकर यांनी दिला आहे.
चौकट
अपमानास्पद वागणूक
समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बऱ्याचवेळा कर्जाचा व्याजदर कमी व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. कर्जाचा व्याजदर कमी करावा असे मत वारंवार मांडल्यामुळे एका विशेष व्यक्तीकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत शिक्षक समितीचे सदस्य भागवत ऊर्फ युवराज कोळेकर यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.