शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या सहकार अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

By admin | Updated: January 20, 2015 00:21 IST

या कारवाईची चाहूल लागल्याने वाघमारेचा सहायक सहकार अधिकारी सर्जेराव चव्हाण (रा. शिरगाव, ता. तासगाव) याने पलायन केले. मात्र लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल

सांगली/तासगाव : सावकारी परवाना देण्यासाठी २८ हजारांची लाच घेणाऱ्या तासगाव येथील सहायक निबंधक संस्था कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. विजय वसंत वाघमारे (वय ४०, रा. केंगार गल्ली, हरिपूर रस्ता, सांगली) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, सोमवारी दुपारी सव्वादोनला ही कारवाई केली. या कारवाईची चाहूल लागल्याने वाघमारेचा सहायक सहकार अधिकारी सर्जेराव चव्हाण (रा. शिरगाव, ता. तासगाव) याने पलायन केले. मात्र लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तासगाव तालुक्यातील आहेत. त्यांना सावकारी व्यवसाय करायचा होता. यासाठी परवाना घेण्यासाठी ते तासगावच्या सहायक निबंधक संस्था कार्यालयात गेले होते. त्यांनी वाघमारे याची भेट घेतली असता, परवाना देण्यासाठी वाघमारेने ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. यावेळी त्याच्या शेजारी त्याचा सहायक चव्हाण बसला होता. या दोघांनीही ‘लाचेची रक्कम दिल्याशिवाय परवाना देणार नाही’, असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली व तक्रारदारास त्यांनी पुन्हा या दोन्ही अधिकाऱ्यांकडे पाठविले. लाचेची रक्कम जास्त होत असून, ती कमी करण्यासाठी तक्रारदाराने विनंती केली. त्यावेळी दोघांनीही, दोन हजार रुपये कमी करुन २८ हजार रुपये देण्यास सांगितले. लाचेची रक्कम आज, सोमवारी देतो, असे तक्रारदाराने सांगितले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कार्यालयात सापळा लावला होता. वाघमारेला दुपारी सव्वादोनला २८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यावेळी चव्हाण तेथे नव्हता. यामुळे तो सापडला नाही. मात्र प्रत्यक्षात तक्रारदाराकडे लाच मागताना त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. चव्हाणला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)