शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

तासगाव पाणी योजना अपूर्णच!

By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST

टप्पा क्र. ३ : २१ कोटींची योजना; नागरिकांत अस्वस्थता

तासगाव : तासगाव शहराच्या विस्तारित भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा टप्पा क्र. ३ च्या योजनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. योजनेचे काम सुरू असले, तरी प्रत्यक्षात पाणी वितरण अद्याप सुरू झालेले नाही. जलशुध्दीकरण केंद्राला विजेचे कनेक्शन जोडावे लागणार आहे. हा तिसरा टप्पा कधी पूर्ण होणार, असा सवाल होत आहे.तासगावच्या उपनगरांना, वस्ती भागासाठी या विस्तारित पाणीपुरवठा टप्पा क्र. ३ ची योजना करण्यात आली. मात्र प्रारंभापासून काही ना काही अडचणी येत गेल्याने ती रेंगाळली. योजना नगरपरिषदेची असली तरी, प्रत्यक्षात सर्व तांत्रिक बाबी व काम पूर्ण करून देण्याची जबाबदारीच जीवन प्राधिकरणची आहे.२१ कोटीची ही पाणी योजना मंजूर करण्यात आली. वस्तुत: २०११ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आता २०१४ संपत आले तरी योजनेचे थोडेसेही काम सुरू झालेले नाही. आ. आर. आर. पाटील यांनी निवडणुकीनंतर या योजनेबाबत अधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत जोरदार खडाखडी झाली होती. योजनेचे काम त्यातील पहिला भाग १५ दिवसांत सुरू झाला (दि. ३० पर्यंत) नाही, तर जीवन प्राधिकरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता.यानंतर रेंगाळलेल्या कामाने थोडा का होईना पण वेग घेतला. योजनेतील पुणदी रस्ता परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. डी. चौगुले यांनी सांगितले. सध्या पाणीपुरवठ्याची चाचणी घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले. पुणदी रस्ता विभागात यापूर्वी लाईन टाकण्यात आली आहे. एकूणच रेंगाळलेल्या या योजनेला मुहूर्त कधी मिळणार, हा प्रश्न आहे. (वार्ताहर)वीज कनेक्शन नाहीपाणी पुरवठ्याची केवळ चाचणी घेण्यात आली असली, तरी जलशुध्दीकरण प्रकल्पाला अद्याप वीज वितरणचे अधिकृत कनेक्शन नाही. त्यामुळे स्वच्छ पाण्याची चाचणी अद्याप झालेली नाही. जनरेटरच्या सहाय्याने चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आॅर्डर देण्यात आलेल्या पाईप्सही मिळालेल्या नाहीत. त्यासाठी तांत्रिक पूर्तता बाकी आहे.