शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांत रंगणार सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, गावपातळीवर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आणि पॅनेलच्या जुळवाजुळवीला वेग आला आहे. ...

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, गावपातळीवर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आणि पॅनेलच्या जुळवाजुळवीला वेग आला आहे. बहुतांश गावांत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कारभार्‍यांतच निवडणुकीचा सामना रंगणार आहे. सर्वच इच्छुकांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागून राहिले आहे.

तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपला आहे. या गावांसाठी आचारसंहिता लागू झाली असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी, आरक्षण कोणते पडणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. बहुतांश गावांत खासदार संजयकाका पाटील समर्थक गटाच्या विरोधात आमदार सुमनताई पाटील यांचाच गट आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अपवाद वगळता भाजप विरुध्द राष्ट्रवादीच्या कारभार्‍यांत पारंपरिक लढती होणार असल्याचे स्पष्ट आहे. गावातील कारभार्‍यांकडून पॅनेल तयार करण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली असून वित्त आयोगातून सक्षम झालेल्या ग्रामपंचायतींची सूत्रे आपल्याकडेच राहण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. कोरोनोचा व्हायरस कमी होत असतानाच, राजकारणाच्या व्हायरसने निवडणुका लागलेली गावे ढवळून निघत आहेत.

चौकट :

नोहेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व सदस्यसंख्या...

आळते (९ सदस्य), बोरगाव (१३), दहीवडी (९), धामणी (७), ढवळी (११), धोंडेवाडी (७), धुळगाव (९), डोंगरसोनी (१३), डोर्ली (७), गव्हाण (११), गोटेवाडी (७), गौरगाव (९), हातनोली (९), हातनूर (१३), जरंडी (९), जुळेवाडी (९), कवठेएकंद (१७), कौलगे (७), लोढे (७), लोकरेवाडी (७), मांजर्डे (१५), मोराळे (पेड) (७), नागाव (नि.) (९), नरसेवाडी (७), निंबळक (९), पाडळी (७), पेड (१५), राजापूर (११), सावळज (१७), सिध्देवाडी (१३), शिरगाव (वि.) (९), तुरची (१५), वज्रचौंडे (७), विजयनगर (५), विसापूर (१५), वडगाव (९), वाघापूर (७), यमगरवाडी (७), येळावी (१७).