शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात सर्पमित्राचा घोणसच्या दंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

तासगाव : तासगाव-चिंचणी मार्गावरील द्राक्षबागेतील घोणस पकडत असताना या सापाच्या दंशाने येथील संजय माळी (वय ४८, रा. माळी गल्ली, ...

तासगाव : तासगाव-चिंचणी मार्गावरील द्राक्षबागेतील घोणस पकडत असताना या सापाच्या दंशाने येथील संजय माळी (वय ४८, रा. माळी गल्ली, तासगाव) या सर्पमित्राचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

ट्रॅक्टरचालक म्हणून काम करणारे संजय माळी सर्पमित्र म्हणून अनेक वर्षांपासून काम करत होते. गुरुवारी सायंकाळी तासगाव-चिंचणी रोडवरील द्राक्षबागेत दोन घोणस असल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक नर व दुसरी मादी होती. संबंधित शेतकऱ्याने तातडीने सर्पमित्र संजय माळी यांना फोन केला. नेहमीप्रमाणे माळी तातडीने द्राक्षबागेत पोहोचले. बागेत त्यांना नर व मादी असे दोन घोणस सर्प दिसले. सुरुवातीला त्यांनी आपले कसब पणाला लावत एक घोणस सर्प पकडला व त्यास पोत्यात घातले. नंतर दुसरा घोणस सर्प पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दुसरा घोणस पकडण्यात त्यांना यश येत नव्हते. बरेच प्रयत्न करूनही हा सर्प हाताला लागत नव्हता. दरम्यान, ही घोणस पकडण्याच्या नादात खवळलेल्या या घोणसने माळी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दंश केला. काही कळायच्या आतच घोणसने दंश केल्याने माळी यांच्या अंगाचा थरकाप उडाला. क्षणार्धात माळी बेशुद्ध पडले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांची प्राणज्योत मालवली.

अचानक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. बघता-बघता या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

चौकट :

शेकडो सापांना जीवदान

माळी यांनी शेकडो साप, नागांना जीवदान दिले होते. कोणाचाही फोन आला की ते हातातील काम सोडून तेथे धाव घेऊन तात्काळ साप पडकून त्याला जीवदान देत होते. अशा सर्पमित्राचा मृत्यू झाल्याने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.