शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव नगराध्यक्षांची ९ ला निवड

By admin | Updated: April 28, 2016 00:15 IST

अविनाश पाटील दावेदार : सोमवारपासून अर्ज दाखलची प्रक्रिया

तासगाव : तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. त्यानुसार भाजपच्या तिसऱ्या नगराध्यक्षाची निवड ९ मे रोजी होणार असून, नगरसेवक अविनाश पाटील नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहेत.पाच महिन्यांपूर्वी पालिकेतील सत्तेचे समीकरण बदलले. पालिकेत भाजपची आणि पर्यायाने खासदार संजयकाका पाटील गटाची एकहाती सत्ता आली. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीतून आलेल्या सुशिला साळुंखे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली. बाबासाहेब पाटील यांचा तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर, त्यांनीही नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नगराध्यक्षाची उत्सुकता आहे. मात्र मागील नगराध्यक्ष निवडीवेळीच बाबासाहेब पाटील आणि अविनाश पाटील यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांत चार-पाच नावे असली तरी, अविनाश पाटील यांना नगराध्यक्ष पदाची संधी निश्चित मानली जात आहे. मात्र खासदार संजयकाकांच्या निर्णयानंतरच अधिकृतरित्या याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधित भाजपचा तिसरा नगराध्यक्ष होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)