शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव-कवठेमहांकाळ शिवसेना सोडणार नाही

By admin | Updated: July 10, 2014 23:17 IST

दिवाकर रावते : कार्यकर्त्यांचा मेळावा

कवठेमहांकाळ : कोणत्याही परिस्थितीमध्ये तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ शिवसेना सोडणार नाही. येथून निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांनी आज (गुरुवार) कवठेमहांकाळ येथे आयोजित शिवबंधन मेळाव्यात केले. रावते म्हणाले की, स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात राज्यातील तेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या सुख-दुखाशी काहीही देणे-घेणे नाही. जयंत पाटील यांनी राजू शेट्टींविरोधात लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देत पळ काढला. त्यांच्याच मतदार संघात उध्दव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करू.पतंगराव कदम यांनी पुत्रप्रेमापोटी कडेगाव, पलूसमधील सुमारे सव्वालाख मतदारांची नावे पुणे लोकसभा मतदार संघात नोंदविली. मात्र त्यांना पुणेरी जनतेने चांगलाच हिसका दाखविला. आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या भ्रष्ट सरकारचा पाडाव करण्याची वेळ आली असून, त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे आणि विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवावा, यासाठी रात्रीचा दिवस करावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य पाटील, तालुका शिवसेना प्रमुख दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. जिल्हा संघटक सुवर्णा मोहिते, ज्ञानेश्वर चव्हाण, बाबूराव दुधाळ, नितीन काळे, विशाल रजपूत, अनिल बाबर, दिलीप गिड्डे, विजय डुबुले यांच्यासह तासगाव, जत, कवठेमहांकाळ आदी तालुक्यातील शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)