शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

तासगावच्या फरारी वकिलास अटक

By admin | Updated: July 15, 2014 00:57 IST

कवलापूर अपघात : कोठडीत रवानगी

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे दगडू नाना चव्हाण (वय ६७) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारीचा चालक अ‍ॅड. सचिन सुभाष गुजर (वय ४३, रा. सोमवार पेठ, तासगाव) यास आज (सोमवार) सकाळी सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर तो फरारी झाला होता. कवलापुरातील तासगाव रस्त्यावरील खाडिलकर मळ्याजवळ चव्हाण यांचा उकिरडा आहे. शुक्रवारी सायंकाळी ते शेण टाकण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गुजर सांगलीहून तासगावला मोटारीने (क्र. एमएच ०४ वाय ८७६०) भरधाव निघाला होता. खाडिलकर मळ्याजवळ ओव्हरटेक करीत असताना त्याचा ताबा सुटल्याने मोटारीने चव्हाण यांना जोराची धडक दिली होती. यामध्ये ते उडून पडले. त्यानंतर मोटार रस्त्याकडेला विजेच्या व दूरध्वनी खांबावर जाऊन आदळली होती. दूरध्वनी खांब वाकल्याने तो चव्हाण यांच्या डोक्यात पडला होता. यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर गुजरने मोटार तिथेच सोडून पलायन केले होते. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातग्रस्त मोटार जप्त करण्यात आली होती. मोटारीच्या क्रमांकावरून गुजरचे नाव निष्पन्न झाले होते. सोमवारी सकाळी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)