शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव : ठेकेदाराची निविदा तासगावात पळविली, : भाजप नगरसेवकाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:36 IST

तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता.

ठळक मुद्देतासगाव नगरपरिषदेसमोर प्रकार

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींच्या विकास कामांसाठी निविदा दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार पालिकेत निविदेची कागदपत्रे जमा करण्यासाठी आला होता. यावेळी शहरातीलच काही ठेकेदारांनी या ठेकेदाराची निविदाच पळवून नेण्याचा कारनामा केला. इतकेच नव्हे, तर या प्रकारातून तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकालादेखील धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे.

तासगाव शहरात साडेतीन कोटींच्या, १२ कामांसाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या कामांची आॅनलाईन निविदा दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर, दाखल केलेल्या निविदांची पालिकेत कागदोपत्री प्रत्यक्ष पूर्तता (फिजिकल सबमिशन) करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

बहुतांश ठेकेदारांनी संबंधित कामांची निविदा पालिकेत जमा केली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील एक ठेकेदार निविदा दाखल करण्यासाठी आला होता. यावेळी तिथे उपस्थित शहरातील ठेकेदारांनी संबंधित ठेकेदार निविदा दाखल करण्यापूर्वीच त्याच्या हातातील निविदा पळवून नेण्याचा कारनामा केला. हा प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या भाजपच्या एका नगरसेवकाच्या लक्षात आला. त्याने याचा जाब ठेकेदारांना विचारला. यावेळी या नगरसेवकात आणि ठेकेदारांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

या ठेकेदारांनी नगरसेवकाला धक्काबुक्कीदेखील केल्याची चर्चा पालिकेत सुरु होती. निविदा दाखल करण्याची मुदत संपल्यामुळे कवठेमहांकाळच्या ठेकेदाराला नंतर निविदा दाखल करता आली नाही. मात्र ठेकेदारीवरुन पालिकेत झालेल्या खडाजंगीची आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाला, भाजपशी संबंधित ठेकदारांकडूनच झालेल्या धक्काबुक्कीची शहरात जोरदार चर्चा सुरु होती.‘तो’ ठेकेदार नगरसेविकेचा भाचाशहरातील विकास कामांची निविदा शहरातीलच सत्ताधाºयांशी संबंधित ठेकेदारांनी घ्यायची, असा अलिखित नियम सत्ताधाºयांकडून करण्यात आला आहे. मात्र यावेळी प्रभाग सातमधील उद्यान सुशोभिकरण आणि संरक्षक भिंतीच्या २३ लाख रुपयांच्या कामासाठी कवठेमहांकाळमधील ठेकेदाराने आॅनलाईन निविदा दाखल केली होती. हा ठेकेदार सत्ताधारी भाजपच्याच एका नगरसेविकेचा भाचा आहे. त्यामुळेच त्याने निविदा दाखल करून मंगळवारी तो फिजिकल सबमिशनसाठी आला असताना, निविदा पळवापळवीचा प्रकार झाला. त्यामुळे सत्ताधाºयांतील ठेकेदारी चांगलीच चर्चेत आली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाgovernment schemeसरकारी योजना