शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीविरोधात आज तासगाव बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:13 IST

मणेराजुरी मारहाण प्रकरण : सर्वपक्षीय नेत्यांचा खासदारांवर निशाणा; आंदोलन करणार

तासगाव : भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या वरदहस्ताने चिंंचणी (ता. तासगाव) मधील गुंडांकडून तासगाव शहरासह तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीपासून ते ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. खासदारांच्या वरदहस्तानेच हे प्रकार होत असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार बैठकीत केला. गुुंडगिरीच्या निषेधार्थ शनिवारी तासगाव बंद करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी दिली. मणेराजुरीचे भाजपचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पवार आणि त्यांचे चुलते संभाजी पवार यांना चिंंचणीतील काही लोकांनी गुरुवारी तासगावात मारहाण केली. या घटनेनंतर शुक्रवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पवार, भाजपचे प्रदीप पवार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष महेश पाटील, शेकापचे शरद शेळके, नागाव (क.)चे सरपंच महेश पाटील, रवींद्र साळुंखे, दिलीप जमदाडे, नेताजी पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.चिंंचणीतील काही गुंडांकडून मणेराजुरीच्या दोघांना मारहाण झाली. तासगाव शहर आणि तालुक्यात हे प्रकार वारंवार होत आहेत. काही दिवसांपूर्वी नक्षत्र हॉटेलमध्ये तोडफोड झाली. तेथील वेटरच्या अंगावर गरम चहा ओतण्यात आला. मुजावर हॉटेलमध्ये तोडफोड झाली. आठवड्याभरापूर्वी ढवळवेस येथील सुनील माने या युवकाचा पाय मोडला. या सगळ्या घटनांच्या पाठीमागे चिंंचणीचे बेफाम झालेले गुंड आहेत. त्यांना खासदार संजयकाका पाटील पाठीशी घालत आहेत. त्यांच्या वरदहस्तामुळेच चिंंचणीची गुंडगिरी फोफावली असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केला.आम्ही खासदार संजयकाकांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहोत. मणेराजुरीत आम्ही त्यांचा गट जिवंत ठेवला. आमचे सगळे आयुष्य त्यांच्याशी राजकीय निष्ठा ठेवून घालवल्यानंतरदेखील आमच्यावर लाठ्या-काठ्या खायची वेळ आली आहे. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी त्रास दिला. मारहाणीनंतर दुपारी एक वाजता तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो होतो. आठ वाजता तक्रार दाखल केल्याचे भाजपचे मणेराजुरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार यांनी सांगितले. चिंंचणीतील गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी भाजप म्हणूनच बंदमध्ये सहभागी होऊन निषेध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी तुरची येथील मुलांना गंभीर गुन्ह्यांची कलमे लावून दोन महिने तुरुंगात ठेवणारे पोलिस चिंंचणीच्या गुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य सतीश ऊर्फ बंडू पवार यांनी केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई म्हणाले, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तालुक्यासह राज्यात तंटामुक्ती केली. मात्र आता तालुक्यात पुन्हा तंटा सुरु झाला आहे. पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला हवी. शेकापचे शरद शेळके यांनी, महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीत चिंंचणीच्या युवकांचा पुढाकार असून पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी अशा गावगुंडांसोबत फिरत असतात, असा आरोप करुन रोडरोमिओंवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेऊन गुंडगिरीचा बंदोबस्त करावा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल. त्यासाठी शनिवारी तासगाव बंद करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले. (वार्ताहर)तासगाव बंदची : उत्सुकता खासदार संजयकाका पाटील यांच्या वरदहस्तामुळेच चिंंचणीतील गुंडगिरी फोफावली असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी तासगाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बंद अप्रत्यक्षरित्या खासदारांविरोधातच होत असल्याने या बंदबाबत उत्सुकता आहे. तसेच या बंदमध्ये खासदार संजयकाका पाटील समर्थक मणेराजुरीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतल्यामुळे, हा चर्चेचा विषय ठरला आहे.