अधिक साबळे हे तासगावचा रथोत्सव पाहण्यासाठी मित्रासोबत तासगावला आले होते. त्यांनी आपली दुचाकी (एम. एच. १४, जे. के. ८७२३) राममंदिरासमोर उभी केली. दर्शन करून अडीच वाजता परत आल्यावर त्यांना आपली दुचाकी दिसली नाही. त्यांनी याची तक्रार तासगाव पोलिसात दिली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्याचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना डी. एम. बापू पाटील क्रीडांगणासमोर एक तरुण विनानंबरप्लेट दुचाकीवरून संशयास्पद फिरत होता. यावेेळी त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सातारा जिल्ह्यातून गाड्या चोरून आणत त्याचा मिरज येथील मित्र समीर बादशहा नदाफ याच्या मध्यस्थीने तासगाव परिसरात विकल्या असल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून तीन पिकअप व सहा दुचाकी असा १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास अमित परिट करत आहेत. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम, सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, समीर आवळे, सतीश खोत, विनोद सकटे, दत्तात्रय जाधव, प्रशांत सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी यांनी भाग घेतला होता.