शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात नेत्यांच्या नुरा कुस्तीत कार्यकर्ते चितपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

तासगाव : तासगाव तालुक्यात यावेळी पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या फळीतील अनेक नेत्यांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

तासगाव : तासगाव तालुक्यात यावेळी पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या फळीतील अनेक नेत्यांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र दिसून येत आहे. परंपरागत विरोधक असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोयीनुसार नुरा कुस्तीचा डाव खेळण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्तेच चितपट झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली असून, नाराजांकडून प्रस्थापित पक्षांऐवजी तिसऱ्या पर्यायालाच पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नेत्यांच्या धेारणामुळे तिसऱ्या पर्याय तयार होणार की बासनात गुंडाळला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तासगाव तालुक्यात काका गट विरुध्द आबा गट असे दोनच प्रबळ गट एकमेकांविरोधात परंपरागत विरोधक म्हणून उभे ठाकलेले असतात. तत्कालीन आमदार दिनकर पाटील यांच्याविरोधात आर. आर. पाटील यांनी राजकारणात एन्ट्री केल्यापासून हे दोन्ही गट आजपर्यंत आमने-सामने येत असतात. मात्र गेल्या काही निवडणुकांपासून तालुक्यातील हे गट तसेच असले, तरी नेत्यांचे राजकारण सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला न समजणारे आहे.

व्यासपीठावर विरोधक म्हणून काम करताना, पडद्याआड मात्र एकमेकांना अंडरस्टॅन्डिगचे राजकारण करून सोयीनुसार भूमिका घेतली जात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्याचा परिणाम यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे.

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची हालचाल सुरू आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच अनेक गावांत नेहमीसारखे धुमशान सुरू नाही. काही ठिकाणी बिनविरोधसाठी हात पुढे केला आहे; तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांना तुम्ही लढा, मी सोबत आहे, असे सांगून हात वर केले आहेत.

नेत्यांच्या भूमिकेमुळे अस्वस्थतेची पहिली ठिणगी भाजपमध्ये पडली. भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांनी प्रस्थापित राष्ट्रवादीत जाणे अपेक्षित होते. तिथे पदांची खैरातही झाली असती; मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नुरा कुस्तीमुळे या नाराजांनी शिवसेनेची वाट धरून तिसरा पर्याय स्वीकारला. तालुक्यातील आणखी अनेक नाराज कार्यकर्ते तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत.

आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या राजकीय नुरा कुस्तीने चितपट होणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराजीतून एकत्रित येत सक्षम तिसरा पर्याय तयार करणार की, दोन्ही नेते हा पर्याय बासनात गुंडाळून ठेवणार, हे लवकरच समजेल.

चौकट

राजकारणाचा पॅटर्न

खासदार आणि आमदार एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत, असे मानले जाते. मात्र तरीही कवठेमहांकाळ पंचायत समितीत एकमेव काका समर्थक पंचायत समिती सदस्यांना सभापती पद मिळाले, तर नुकत्याच झालेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीतही हाच पॅटर्न राबविण्यात येणार होता. मात्र दोन्ही नेत्यांच्या अनपेक्षितपणे सगरे गटाने खेळलेल्या डावाने उपनगराध्यक्षपद सगरे गटाच्या ताब्यात गेले. विधानसभेलाही असाच पॅटर्न राबवला गेला हेाता. हाच राजकीय नुरा कुस्तीचा संधिसाधू पॅटर्न निष्ठावंतांत अस्वस्थता पसरवणारा आहे.

फोटो : खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील