शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तांदुळवाडीत हाणामारी

By admin | Updated: December 29, 2016 23:48 IST

क्रिकेटचा वाद : चारचाकीवर दगडफेक; लाखाचे नुकसान

कुरळप/येलूर/तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे तांदुळवाडी व मालेवाडी येथील युवकांमध्ये तीन दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सामन्यावेळी वाद झाला होता. त्याचे पर्यवसान बुधवारी धुमश्चक्रीत झाले. भांडण मिटवायला आलेल्यांमध्ये वादावादी सुरू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, मालेवाडीसाठी असलेल्या पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलचे अज्ञातांनी नुकसान केले.याबाबत रणजित हंबीरराव खवरे (वय ३३, रा. मालेवाडी) यांनी तांदुळवाडी येथील १२ जणांविरोधात कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे. भांडणावेळी खवरे यांच्या चारचाकी गाडीवर केलेल्या दगडफेकीत त्यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.तांदुळवाडी येथे तीन दिवसांपूर्वी क्रिकेट स्पर्धा झाल्या. यामध्ये मालेवाडीतील मुलांचे तांदुळवाडीच्या मुलांबरोबर भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी मालेवाडीतील रणजित खवरे मित्रासह तांदुळवाडीत बुधवारी रात्री आले होते. त्यावेळी तांदुळवाडीतील पोलिसपाटील यांचे पती राजाराम वसंत पाटील, नंदकुमार गुरव, दिग्विजय लक्ष्मण मोहिते, हर्षल अशोक पाटील, हर्षल सर्जेराव सावंत, विजय यशवंत कोळी, कृष्णात पांडुरंग पाटील, आनंदराव सखाराम पाटील (सर्व रा. तांदुळवाडी) यांनी खवरे यांच्या चारचाकी गाडीवर (एमएच १0 बीडब्ल्यू ५३११) दगडफेक केली. त्यामुळे गाडीच्या काचा फुटून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेनंतर दोन्ही गावांमध्ये तणाव निर्माण झाला असून, कुरळप पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तांदुळवाडी येथील राजाराम वसंत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. मालेवाडीसाठी नदीवर असलेल्या राजारामबापू पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलच्या इमारतीचा दरवाजा व वायरी तोडण्यात आल्या आहेत. फ्युजही काढून नेल्या आहेत. हा प्रकार नेमका कोणी केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (वार्ताहर)गाव बंदची हाकपोलिसपाटलांचे पती राजाराम वसंत पाटील यांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ तांदुळवाडी येथील त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी ‘गाव बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले होते. सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.तांदुळवाडी-मालेवाडी वाद जुनाचगेल्या सहा वर्षांपासून तांदुळवाडी व मालेवाडी येथील दोन गटांत वादाचे प्रकार घडत आहेत. या ना त्या कारणावरून वादाला तोंड फुटते. त्यामुळेच तांदुळवाडी येथील स्थानिकांनी मालेवाडी येथील व्यावसायिकांना तांदुळवाडीत व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे.