शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

किस्से, कहाण्यांमधून पवारांचा यशोमंत्र

By admin | Updated: January 11, 2016 00:46 IST

कार्यक्रमात रंगत : सांगलीची रेश्मा, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांची यशोगाथा

सांगली : अनेक किस्से, कहाण्यांचा अनुभव कथन करीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी सांगलीत, कोणत्याही क्षेत्रात कसे यशस्वी होता येते, याचा मंत्र दिला. सांगलीची रेश्मा पाटील, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांच्या विदेशातील कर्तृत्वाचा प्रवास मांडताना त्यांनी, संकटांवर मात करा आणि यशस्वी व्हा, असा सल्लाही दिला. सांगलीतील यंगमेन्स सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी असली आणि संकटावर मात करण्याची हिम्मत असेल तर, तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठीच्या या गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत. जगाच्या पाठीवर प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठणारे लोक प्रवासात अनेकदा भेटले. त्यांच्या कहाण्या ऐकून मीही थक्क झालो. इंग्लंडच्या दौऱ्यात असताना एका भारतीय हॉटेलमध्ये मी जेवणासाठी गेलो होतो. त्यावेळी जेवणाच्या ताटाबरोबर चार तळलेल्या मिरच्याही त्याठिकाणी ठेवल्या गेल्या. मी आश्चर्यचकित झालो. ‘या मिरच्या इथे कोणी ठेवल्या?’, असा सवाल मी केला. त्यावर एक तरुणी त्याठिकाणी आली आणि तिनेच त्या मिरच्या ठेवल्याचे सांगितले. आपल्याकडील लोकांना तळलेल्या मिरच्या तोंडाला लागल्याशिवाय जेवणाची चव लागत नाही, असेही तिने सांगितले. रेश्मा पाटील असे तिचे नाव होते. ती सांगली जिल्ह्यातील होती. पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिने त्या हॉटेलमधील नोकरी स्वीकारली होती. कऱ्हाड तालुक्यातील डांगे नावाचे एक गृहस्थही न्यूयॉर्कला भेटले. ते मराठीतच बोलत होते. माझ्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि घरी जेवणाचे निमंत्रण दिले. त्यांचे घर लांब असल्याने माझ्या कार्यक्रमातून वेळ काढून तेवढ्या लांब जाणे शक्य नव्हते. ही गोष्ट जेव्हा त्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी विमान पाठवून देऊ का, असे विचारले. मला धक्काच बसला. तुमचा उद्योग तरी काय आहे? असे त्यांना मी विचारले. अमेरिकन एअरफोर्सला लागणारे स्पेअरपार्टस् बनविणाऱ्या कंपनीचे ते मालक होते. कऱ्हाड तालुक्यातील एक साधा माणूस जर अमेरिकेसारख्या देशात स्वत:ची भली मोठी कंपनी उभी करू शकत असेल, तर कोणालाही ही गोष्ट साध्य होऊ शकते. जगाच्या पाठीवर काम करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. शाळेत मी किती कच्चा होतो कळलं का?व्यक्तिगत अमृतमहोत्सव आणि संस्थात्मक अमृतमहोत्सवाची तुलना करताना शरद पवारांनी, भा. रा. तांबे यांच्या ‘रिकामे मधुघट’ या कवितेची आठवण करून दिली. ‘ढळला रे ढळला दिन सखया’ ही एकच ओळ कशीबशी म्हणून त्यांनी उपस्थितांनाच, ‘पुढच्या ओळी काय?’, अशी विचारणा केली. त्यावर सारेच शांत बसले. ‘शाळेत मी किती कच्चा होतो, हे तुम्हाला यावरून कळले असेल’, असे पवार म्हणाले आणि उपस्थितांत हशा पिकला. देणेकऱ्यांचा तगादा : देशच सोडला...टोकियोला विमानतळावर उतरलो, तेव्हा एका माणसाने मला ‘राम राम साहेब’, म्हणून हाक दिली. मी लगेच ओळखले की, हा नक्कीच आपल्या गावाकडचा असणार. त्याने तो उस्मानाबादचा देशमुख असल्याचे सांगितले. त्याची कहाणीही थक्क करणारी होती. गावातील एका निवडणुकीत या देशमुखांनी वारेमाप खर्च केला होता. तरीही निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर, छपाईवाल्यापासून ते पेट्रोल पंपवाल्यापर्यंत अनेक देणेकऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्यांनी देशच सोडला. सुरुवातीचे काही दिवस स्वित्झर्लंडमध्ये काढून ते जपानच्या टोकियोपर्यंत पोहोचले. दहा बाय वीसच्या जागेत त्यांनी एक रेस्टॉरंट काढले. याठिकाणच्या खिमा-चपातीने जापनीज् लोकांना वेड लावले आणि आता हेच देशमुख तेथे एका मोठ्या हॉटेलचे मालक बनले आहेत, असे पवार म्हणाले.