शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडल कार्यालयातील झिरो तलाठी गायब

By admin | Updated: November 11, 2015 00:13 IST

मिरज तहसीलदारांचा दणका : नागरिकांची अडवणूक व आर्थिक लुटीच्या तक्रारी

मालगाव : तलाठी व मंडल कार्यालयात अधिकारी म्हणून मिरविणाऱ्या झिरो तलाठ्यांच्या कारनाम्यांची वेळाने का असेना, महसूल विभागाला दखल घ्यावी लागली आहे. तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात झिरो तलाठी व खासगी उमेदवारांची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारल्याने तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयातून झिरो तलाठी गायब झाले आहेत. मिरज तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात कामकाजाच्या मदतीसाठी झिरो तलाठी व खासगी उमेदवारांच्या नेमणुका केल्या होत्या. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी सुचविलेलीच उतारे, सात-बारा व दाखले ही कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात असत. मात्र तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या झिरो तलाठ्यांनी कामकाजात नागरिकांची अडवणूक व आर्थिक लूट सुरु केल्याच्या तक्रारी वाढल्याने, महसूल विभागाने यापूर्वी नियमबाह्य नेमणुकांची दखल घेत झिरो तलाठी व खासगी उमेदवारांना तलाठी व मंडल कार्यालयात नेमणुकीस पायबंद घालण्याचा आदेश दिला होता. मात्र तलाठी, मंडल अधिकारी व झिरो तलाठी यांचे चांगले संबंध जुळल्याने, वरिष्ठांचा आदेश धुडकावत सर्वच तलाठी कार्यालयात झिरो तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात खासगी उमेदवारांच्या मदतीने कारभार सुरुच ठेवला होता. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी शासकीय दफ्तर खासगी माणसाच्या ताब्यात देणे गैर असताना, कार्यालयातील संपूर्ण दफ्तरच त्यांच्या ताब्यात देण्याचे धाडस केल्याने, झिरो तलाठीच कारभारी झाले होते. त्याचा फटका तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना बसला आहे. या गंभीर प्रकाराची मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांनी गंभीर दखल घेत, झिरो तलाठी व खासगी उमेदवारांची नेमणूक करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. तहसीलदारांच्या दणक्याने तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात ठाण मांडून शेतकऱ्यांची अडवणूक व आर्थिक लूट करणारे झिरो तलाठी व खासगी उमेदवार गायब झाले आहेत. (वार्ताहर)अधिकारी त्रस्त झिरो तलाठी व खासगी उमेदवारांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या परस्पर पैसे घेऊन काम न करणे, तसेच परस्पर नोंदीचे गैरप्रकार करणे, या प्रकारामुळे संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांची झोपच उडाली होती.