शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगलीमध्ये ‘तळीराम’ सुसाटच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:06 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अनेक प्रकारच्या कारवाईचा ससेमीरा मागे लावूनही नशेत वाहन चालविणाऱ्या सांगलीतील तळीरामांच्या संख्येत घट झालेली नाही. गेल्या १६ महिन्यात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अठराशे तळीरामांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने या तळीरामांकडून २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही आकडेवारी थक्क करणारी आहे.सांगली , ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अनेक प्रकारच्या कारवाईचा ससेमीरा मागे लावूनही नशेत वाहन चालविणाऱ्या सांगलीतील तळीरामांच्या संख्येत घट झालेली नाही. गेल्या १६ महिन्यात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अठराशे तळीरामांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने या तळीरामांकडून २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही आकडेवारी थक्क करणारी आहे.सांगली, मिरजेसह जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी होत असे. पण दारुच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांवर कधीच कारवाई होत नव्हती. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी ही कारवाई सुरु केली. तेव्हापासून या कारवाईत अजूनही सातत्य कायम आहे. जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. पण या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांकडून तळीरामांवर फारशी कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक नियंत्रण शाखा तळीरामांवर कारवाई करण्यात अव्वल ठरली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दारुच्या नशेत वाहन हातात असले की, वेगावर नियंत्रण राहत नाही. सुसाटपणे वाहन चालविले जाते. यातून अपघात होतात. तळीराम स्वत:सह दुसºयाचा जीवही धोक्यात टाकतात.दारूच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांना रात्रभर पोलीस कोठडीत ठेवणे, त्यांची दुचाकी जप्त करणे, न्यायालयामार्फत दंड ठोठावणे, त्यांचे ‘लायसन्स’ निलंबित करणे अशा कारवाया करण्यात येत आहेत.‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्राची मदतपूर्वी दारुच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांवर कारवाई करताना पोलिसांना खूप कसरत करावी लागत होती. संबंधित तळीरामाच्या रक्त व लघवीची तपासणी करावी लागत असे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करावी लागत असे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक पळवाटा काढून तळीरामा सहीसलामत सुटायचे. पण ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्रामुळे वाहनाचा चालक दारू पिऊन गाडी चालवत आहे की नाही, हे लगेच जागेवरच समजते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्र वाहतूक पोलिसांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पुरविण्यात आले आहे.शिक्षेची तरतूदनशेत वाहन चालविल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून जास्तीत जास्त सहा महिने कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्हीही शिक्षा. एखादा याप्रकरणी सापडल्यानंतर पुन्हा तीन वर्षात परत सापडला, तर दोन वर्षे कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्हीही शिक्षा आहेत....तर खटला चालविला जातो!तळीराम सापडले की, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. त्यांची दुचाकी जप्त केली जाते. दुसºयादिवशी न्यायालयात खटला पाठविला जातो. तिथे न्यायाधीशांकडून ‘तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?’, अशी विचारणा केली जाते. ‘कबूल आहे’, असे उत्तर दिले, तर न्यायालयाकडून दंड ठोठावला जातो. ‘गुन्हा कबूल नाही’, असे सांगितले, तर पुढे खटला चालविला जातो.