शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘तासगाव’ कारखान्याबाबत आठवड्यात निर्णय घ्यावा

By admin | Updated: July 10, 2014 23:17 IST

आर. आर. पाटील : मुंबईतील बैठकीत राज्य बँकेला इशारा

भिलवडी : विधी व न्याय विभागाने योग्य निर्णय देऊनही राज्य सहकारी बँक तासगाव—पलूस सहकारी साखर कारखाना अवसायकांना किंवा दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालवावयास देण्यास टाळाटाळ करीत आहे. यंदाच्या गळीत हंगामात हा कारखाना सुरु होणे आवश्यक आहे. आठवडाभरात बँकेने योग्य पाऊल न उचलल्यास बँकेच्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय मंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून बँकेस ठोस निर्णय घेण्यास भाग पाडू, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला.तासगाव कारखाना आगामी गळीत हंगामात सुरू करण्याच्यादृष्टीने आज (गुरुवार) मंत्रालयात गृहमंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीस गृहमंत्र्यांसह सहकार सचिव राजगोपाल देवरा, उपसचिव श्रीमती कविता पारकर, कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय गोरे, अवसायक मंडळाचे व्यवस्थापक चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सहकार सचिव राजगोपाल देवरा यांनी प्रथम कारखान्याची विक्री प्रक्रिया रद्द केल्याबाबतची कारणे स्पष्ट केली. ते म्हणाले की, याबाबत राज्य बँकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले व गणपती संघासही कळविले होते. ही विक्री प्रक्रिया रद्द करण्याबाबत ऋण वसुली अपीलीय प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल आहे. गणपती संघाबरोबरचा विक्री करार रद्द झाल्याने राज्य बँकेने कारखाना अवसायक मंडळाच्या ताब्यात देण्याबाबत किंवा दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यास कोणतीच अडचण नसल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले. आर. आर. पाटील म्हणाले की, तासगाव व पलूस येथे उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. पण वेळेत ऊस तोडणी न झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदा तासगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये १४ लाख टन इतका ऊस असून, त्याचे वेळेत गाळप होण्याच्यादृष्टीने कारखाना सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. मात्र राज्य बँक जाणीवपूर्वक आडमुठी भूमिका घेणार असेल, तर ते सहन केले जाणार नाही. आठवड्यात बँकेने निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आर. डी. पाटील यांनी, कारखाना सुरू करण्यासाठी तांत्रिक कामे पूर्ण करून गळीत हंगाम सुरू होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)