शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

मनपा घोटाळ्यांबाबत कारवाई करणार

By admin | Updated: May 19, 2017 23:49 IST

मनपा घोटाळ्यांबाबत कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : सांगली महापालिकेत घोटाळे, गैरव्यवहार असतील तर कारवाई करण्यास कचरणार नाही. महापालिकेकडे रस्ते हस्तांतरण करण्यासाठी सौदेबाजीचे प्रकार होत असतील, तर त्यावरही कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिरज शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महापालिकेत घोटाळे असतील, लेखापरीक्षणात गैरव्यवहार झाल्याचे आढळले, तर कारवाईला कचरणार नाही. मात्र राजकीय हेतूने कारवाई करणार नाही. दारू दुकानांना संरक्षण देण्यासाठी महापालिकेकडे रस्ते हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या तक्रारीबाबत ते म्हणाले की, मागील शासनाने २००१मध्ये जेथे पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत, तेथे राज्य आणि राष्ट्रीय मार्ग महापालिकांना हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्या शासन निर्णयाप्रमाणे रस्त्यांचे हस्तांतरण होईल. सरसकट रस्ते हस्तांतरण करण्याचा शासनाचा कोणताही इरादा नाही. रस्ते महापालिकांकडे हस्तांतरीत करण्यासाठी कोणतीही ‘डील’ किंवा सौदेबाजी होत असेल तर सबंधितांवर कारवाई करण्यात येईल.सांगली जिल्"ाने भाजपला लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत भरभरून दिले आहे. त्यामुळे जिल्"ाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे. येथील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. आघाडी शासनात जिल्"ातील ‘पॉवरफुल्ल’ मंत्री असतानाही सांगली जिल्"ाला निधी मिळाला नव्हता. मात्र गेल्या अडीच वर्षात पूर्वीच्या तुलनेत जादा निधी मिळाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाचे काम चांगले असून ग्रामसडक योजनेचा दर्जा उत्तम आहे. नागरी विभागात स्वच्छ अभियान शंभर टक्के आहे. जिल्"ात जलयुक्त शिवाराचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून कृषी विभागाचे २० टक्के काम अपूर्ण आहे. १५ जूनपूर्वी शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासकीय मान्यतेला उशीर होऊ नये यासाठी पावसाळ्यातच पुढील वर्षातील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल. जिल्"ात गेल्या ५० वर्षात झाले नाही, एवढे शौचालयांचे काम गेल्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे. पोलिसांनी डॉल्बीमुक्तीतून बंधारा ही अभिनय कल्पना साकारली आहे. जिल्"ात १५ हजार बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचे उद्दिष्ट असून यापैकी साडेसहा हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्हा पूर्णपणे बेघरमुक्त करण्यात येणार आहे. कृषी पंपांची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी सौरपंप देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.टेंभू योजनेसाठी लागणारी १६५ मेगावॅट वीज पूर्णपणे सौरऊर्जेवर मिळविण्यात येणार असून यासाठी जागेचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. टेंभू योजनेचे पाणी कालव्याऐवजी जलवाहिनीतून देऊन ही योजना पथदर्शी करण्यात येणार आहे. टेंभू योजनेचा खर्च मोठा असल्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न आहे. ताकारी, म्हैसाळ योजनेला निधी देऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहाराची तक्रार असेल तर दोषींवर कारवाई करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. ‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेकर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने आक्रमक झाले. पोलिसांच्या सुरक्षेचे कवच तोडून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. /जलयुक्त’च्या अपूर्ण कामांबाबत अधिकाऱ्यांना खडसावलेमिरज विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या अपूर्ण कामांबाबत जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाची कामे अपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनाने कामे पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.