शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजना सक्षमपणे कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्‍यांतील जनतेसाठी ‘ताकारी उपसा जलसिंचन योजना’ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्‍यांतील जनतेसाठी ‘ताकारी उपसा जलसिंचन योजना’ तारणहार ठरली आहे. याशिवाय येरळा नदीतून वाहत असलेल्या पाण्यामुळे पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही योजनेचा लाभ होत असतो. ही योजना सक्षमपणे कार्यरत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त हाेत आहे.

या वर्षी ताकारी योजनेचे पहिले आवर्तन १० डिसेंबर रोजी सुरू झाले. यामधून पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा सुरू झाला. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. या वर्षी पावसाळा लांबला. यामुळे आवर्तनाची गरज भासली नाही. पाटबंधारेच्या योग्य नियोजनामुळे आवर्तन सुरळीतपणे सुरू आहे. केवळ रब्बीच नव्हे तर उन्हाळी हंगामातही ताकारी योजनेचे आवर्तन वेळेत मिळते. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात प्रामुख्याने ऊसपिकाचा समावेश आहे.

सध्या ताकारी योजनेतून १४ हजार हेक्टर शेतीपिकांना पाणी मिळत आहे. ताकारीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते. यातून शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये कधी-कधी वादही हाेतात. मात्र तरीही एकमेकांना समजून घेऊन योजनेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरही वितरणाचे नेटके नियोजन केले जात आहे. ‘टेल टू हेड’ सर्वांना भरपूर पाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी या आवर्तनावर समाधानी आहेत.

ताकारी योजनेसाठी कोयना धरणात ९.३४ टीएमसीसाठा राखीव आहे. सिंचनाखाली आलेले क्षेत्र, मिळणारी पाणीपट्टी, थकीत आणि वसूल पाणीपट्टी, वीज बिल यांचा विचार केला तर सिंचनक्षेत्र अजूनही वाढणे गरजेचे आहे. दुष्काळावर फुंकर घालण्याचे काम ताकारी योजना मागील १७ वर्षांपासून करीत आहे. योजना सर्व बाबतींत सक्षम आहे. मात्र ती अधिक सक्षम होण्यासाठी शेतकरी आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

चौकट : शेतकऱ्यांचे सहकार्य हवे

उसाशिवाय अन्य पिकांची पाणीपट्टी मिळत नाही. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरणे गरजेचे आहे. अजून लाभक्षेत्र वाढून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होणे आवश्‍यक आहे. अपुरे कर्मचारी असल्याने वितरणात शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाले तर योजना याहूनही अधिक सक्षम होईल.

राजन डवरी

कार्यकारी अभियंता

ताकारी योजना

फोटो : ताकारी कालवा संग्राह्य फोटो वापरावा.