शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी, टेंभूची पाणीपट्टी यंदा जुन्या दरानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:43 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू व ताकारी जलसिंचन योजनांच्या पाणीपट्टीसाठी राज्य ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू व ताकारी जलसिंचन योजनांच्या पाणीपट्टीसाठी राज्य शासनाने ८१-१९ चा फॉर्म्युला जाहीर केला असला तरी, पाटबंधारे विभागाकडून २०१७-१८ हे वर्ष पुढे करून ऊस पिकासाठी जुन्या दरानेच पाणीपट्टीची वसुली सुरू केली आहे. ८१-१९ चा हा नवा फॉर्म्युला आॅक्टोबर २०१९ च्या गळीत हंगामापासून लागू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या वृत्ताला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी तालुक्यांसाठी ताकारी व टेंभू योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे. परंतु, वीज बिल व देखभाल दुरूस्तीच्या खर्चाअभावी या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच दुष्काळी भागातील शेतकºयांनाही पाणीपट्टीची रक्कम भरमसाट द्यावी लागत असल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे.राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनांचा खर्च एकट्या शेतकºयाच्या खांद्यावर टाकण्यापेक्षा त्यातील काही हिस्सा राज्य शासनाने उचलावा, यासाठी आ. अनिल बाबर, सांगोल्याचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विधानसभा अधिवेशनात आवाज उठविला. त्यावेळी राज्य शासन ८१ टक्के व शेतकºयांकडून पाणीपट्टीच्या माध्यमातून १९ टक्के रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला. याबाबतचा अध्यादेश जानेवारी २०१८ ला काढण्यात आला.पाटबंधारे विभागाकडून जुलै ते जून अशी पाणीपट्टीची आकारणी होत असते. त्यामुळे जुलै २०१७ ते जून २०१८ ची पाणीपट्टीची आकारणी यापूर्वीच झाल्याने पाटबंधारे विभागाने जुन्या दरानेच पाणीपट्टी वसुलीसाठी सोनहिरा, केन अ‍ॅग्रो, सह्याद्री, नागेवाडी, गोपूज, क्रांती, विराज व उदगिरी या कारखान्यांना पाणीपट्टी वसुलीसाठी याद्या दिल्या आहेत. ंत्यामुळे चालू गळीत हंगामातील ऊस पिकाच्या पाणीपट्टीची वसुली ८१-१९ या फॉर्म्युल्याऐवजी जुन्या म्हणजे प्रतिहेक्टरी २२ हजार ३४३ रुपये दराने केली जात आहे. यामुळे शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.