शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंकलगीकरांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 11, 2017 00:23 IST

पाण्याची भीषण टंचाई : टँकर मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पाणी पातळीत घट

गजानन पाटील ल्ल संखपाणी-पाणीऽऽ असा टाहो फोडत असलेल्या जत तालुक्यातील अंकलगी गावाला शासनानेही वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने दोन टॅँकरच्या मागणीचा प्रस्ताव देऊनही प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आसपासच्या ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने उन्हातानातून भटकण्याची वेळ आली आहे.पूर्व भागातील अंकलगी या गावाची लोकसंख्या ३ हजार ६७० आहे. गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहे. गेल्या दोन वर्षापासून पाऊसच झाला नसल्याने तलावही कोरडा पडला आहे. पाण्याअभावी विंधन विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षी परतीच्या मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पाण्याची पातळी ६०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. गावामध्ये १४ हातपंप व विंधन विहिरीतून पाणीपुरवठा सुरु होता. तेही पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. अंकलगी व परिसरातील वाडी-वस्तीवरही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. शाळकरी मुलांना सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. वयोवृध्दांनाही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दिवसातील बराच वेळ पाण्यासाठीच खर्च करावा लागत आहे.पाणी कुठून मिळवायचे?अंकलगी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या शासनदरबारी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. टॅँकरची मागणी करुनही टॅँकरने पाणी देण्यास शासन तयार नाही. पाणी कुठून मिळवायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसेच गावाला टॅँकर सुरु झाला तरी, पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न पडल्याची माहिती सरपंच सविता तेली यांनी दिली. टॅँकर मागणीचा प्रस्ताव दिल्याचीही माहिती त्यांनी दिली.तलावाने फिरवली पाठगावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावकामगार तलाठी हे गेल्या अनेक दिवसांपासून सात-बारा आॅनलाईन करायचा आहे, म्हणून गावात येत नाहीत. पाणी टंचाईची माहिती प्रशासनाला मिळत नाही. अहवाल पाठविला जात नाही. नागरिकांचा सात-बारा उतारा नोंदी आदी कामेही प्रलंबित आहेत आणि टंचाईबरोबर नागरिकांचे हाल सुरु आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन टॅँकर सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.साठवण तलाव कोरडागेल्या चार वर्षापासून पुरेसा पाऊस न झाल्याने साठवण तलाव दोन वर्षापासून कोरडा पडला आहे. तलावातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव कोरडा पडल्याने पिके वाळून केली आहेत.