कवठेमहांकाळ : साडेतीन लाखांची दुचाकी पळवणाऱ्या तडीपार गुन्हेगारास अटक करून कवठेमहांकाळ पोलिसांनी दुचाकी हस्तगत केली. लोकेश रावसाहेब सुतार (२७, रा. लिंगनूर, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे.
कवठेमहांकाळ पोलीस रविवारी गस्त घालत होते. त्यावेळेस तालुक्यातील जायगव्हाण परिसरात तडीपार लोकेश सुतार येणार असल्याचे समजले. पोलीस आनंद जाधव, नारायण डवरी, विनोद चव्हाण, प्रशांत मोहिते आदी गस्तीसाठी गेले असता त्यांना लोकेश सुतार साडेतीन लाखांच्या गाडीसह दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव लोकेश सुतार असल्याचे सांगितले व गाडी टाकून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता ती दुचाकी चोरी केली असल्याचे कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक केली.