शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्‍यातील सुतार टोळी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST

सांगली : मिरज तालुक्‍यातील लिंगनूर परिसरातील लोकेश सुतार टोळीवर सांगलीसह चार जिल्ह्यांतून तडिपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित ...

सांगली : मिरज तालुक्‍यातील लिंगनूर परिसरातील लोकेश सुतार टोळीवर सांगलीसह चार जिल्ह्यांतून तडिपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

टोळीचा म्होरक्‍या लोकेश रावसाहेब सुतार (वय २६, रा. लिंगनूर), पपल्या ऊर्फ पपलेश महादेव पाटील (२२, रा. आरग), प्रवीण ऊर्फ सुनील रावसाहेब सुतार (२२, रा. लिंगनूर), सुखदेव ऊर्फ बंड्या हणमंत नाईक (२३, आरग), नागेश उर्फ बाळीशा रावसाहेब सुतार (२१, रा. लिंगनूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुतार टोळी ही २०१६ पासून गंभीर गुन्हे करत आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक गेडाम यांनी तडिपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांनी प्रस्ताव तयार केला. अधीक्षक गेडाम यांनी तातडीने मंजुरी देत सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे या चार जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. कारवाईत अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, प्रवीण वाघमोडे यांचा सहभाग होता.

चौकट

टोळीवर १३ गुन्हे

मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ, आष्टा, विटा तसेच तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी, हत्यार बाळगणे, दरोडा असे गंभीर १३ गुन्हे दाखल आहेत.