मिरज : येथील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने अल्पावधीतच अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार आणि रुग्णसेवेत गरुडभरारी घेतली आहे. आता या हॉस्पिटलच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तो म्हणजे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांची ‘सिनर्जी’मध्ये सेवा सुरू झाली आहे. त्यांनी नुकत्याच शंभर हृदयशस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
पुणे व मुंबईसारखी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सिनर्जी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. याठिकाणी सर्वसामान्य रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी आजपर्यंत सिनर्जीमध्ये शंभर रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. यामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यांनी १०१ व्या रुग्णावर गुरुवारी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. या महिलेची डावी रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉकेज झाली होती, मात्र डॉ. रियाज मुजावर यांनी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान दिले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. रियाज मुजावर आणि सिनर्जी हॉस्पिटलच्या उपचाराबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सिनर्जीच्या हृदयरोग विभागाच्या सर्व टीमचे डॉ. रवींद्र आरळी व डॉ. सुरेश पाटील यांनी अभिनंदन केले.