शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या तडवळे (ता. शिराळा) येथील रुग्णाची डोळ्यांची दृष्टी अचानक कमी आल्याने म्युकरमायकोसिसच्या दृष्टीने तपासणी करण्यात येत आहे.
हा रुग्ण कोरोनावर उपचारासाठी दाखल झाला आहे. सध्या त्याच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली आहे. डोळेही लाल दिसत आहेत. त्यामुळे तातडीने डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी तपासणी केली. त्यानंतर त्याची कोरोना अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली आहे. नाकातील स्राव सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ प्रमोद काकडे यांनी तपासणीसाठी घेतला आहे. या रुग्णास पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
कोट
या रुग्णाची दृष्टी कशामुळे कमी झाली, तसेच त्याला मोतीबिंदू झाला आहे, की कोणत्या अन्य औषधांची प्रतिक्रिया आली आहे, याची माहिती घेतली जात आहे. त्यादृष्टीने डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे, प्रमोद काकडे यांनी तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यांना सांगलीला पुढील चाचण्या घेण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.
-डॉ. जुबेर मोमीन,
वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय, शिराळा