इस्लामपूर : नगरपालिकेच्या सभागृहात अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र व आवारात माहिती जीवनपट लावण्यात यावा. काळा मारुती मंदिरासमोरील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलास नानासाहेब महाडिक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी लोकराज्य विद्या फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी १४ तासांचे लाक्षणिक उपोषण केले.
नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून तांदळे यांनी उपोषणाला सुरुवात केली. रात्री माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, मुख्याधिकारी अरविंद माळी आणि माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडले.
यावेळी मुख्याधिकारी माळी यांनी दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भाजमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, प्रदीप लोहार, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, मनसेचे सनी खराडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी पाठिंबा दिला.
फोटो ओळी: ०५०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर उपोषण न्यूज
इस्लामपूर येथे चंद्रशेखर तांदळे यांच्या उपोषणाला राहुल महाडिक, कपिल ओसवाल यांनी पाठिंबा दिला. यावेळी जलाल मुल्ला, अमित ओसवाल, सुजित थोरात, चेतन शिंदे, बंडा रासकर, विशाल शिंदे उपस्थित होते.