शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमधील विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: March 23, 2017 18:26 IST

कुपवाडमधील माधवनगर रस्त्यालगत असलेल्या प्रकाशनगरमधील वर्षा दत्तात्रय राऊत या विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतकुपवाड (सांगली), दि. 23 - कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत असलेल्या प्रकाशनगरमधील वर्षा दत्तात्रय राऊत (वय ३५, रा. दुसरी गल्ली) या विवाहितेचा बुधवारी रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.प्रकाशनगरमधील वर्षा राऊत या महिलेला महिन्यापूर्वी सर्दी, ताप, अंगदुखी असा किरकोळ आजार सुरू झाल्याने नातेवाईकांनी सुरुवातीला सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर माधवनगर, यशवंतनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना शनिवारी वानलेसवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर पाच दिवस उपचार सुरू होते.बुधवारी रोजी दुपारी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. तेथेच उपचार सुरू असताना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकाशनगर परिसरात घबराट निर्माण झाली आहे.