शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बदली कामगारांचा आत्महत्येचा इशारा - कायम करण्याची मागणी-सांगली  महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:23 IST

गेल्या तीस वर्षांपासून बदली कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना कायम करा, अन्यथा महापालिकेसमोर आत्महत्या करू, असा इशारा या कर्मचाºयांनी सत्ताधारी पदाधिकाºयांना दिला.

ठळक मुद्देसभापतींनी मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासनयात निश्चित असा मार्ग    काढू, अशी ग्वाही अजिंक्य पाटील यांनी दिली.

सांगली : गेल्या तीस वर्षांपासून बदली कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना कायम करा, अन्यथा महापालिकेसमोर आत्महत्या करू, असा इशारा या कर्मचाºयांनी सत्ताधारी पदाधिकाºयांना दिला. यावेळी   स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक शेखर इनामदार यांनी, या आठवड्यात अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेऊन      बदली कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय दिला जाईल अशी ग्वाही  दिली. कायम करण्यासाठी काही संघटनांनी दोन हजार रुपये घेतल्याचीही तक्रार यावेळी काही बदली कर्मचाºयांनी केली.

महापालिकेत कायम कर्मचारी रजेवर असताना त्याच्याजागी ५०० हून अधिक बदली कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. या बदली कर्मचाºयांना कायमस्वरूपी काम दिले जात नाही. महिन्याभरात चार ते पाच दिवसच काम मिळते. त्यांना कायमस्वरुपी आस्थापनेवर नियुक्त करण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. 

त्यासाठी सोमवारी बदली कर्मचारी मोठ्या संख्येने महापालिकेत आले. पालिकेच्या पदाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेरच त्यांनी ठाण मांडले. पदाधिकाºयांची भेट घेऊन, आमचा विचार करा, अशी मागणी त्यांनी केली.    बदली कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुनील मोहिते, सुनंदा वारे यांच्यासह कर्मचाºयांनी स्थायी समितीचे नूतन सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक शेखर इनामदार यांची भेट घेऊन निवेदन दिले.     

यावेळी संतप्त बदली कर्मचाºयांनी, आमच्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, अशी मागणी केली. काही कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक कर्मचारी बदली म्हणूनच निवृत्त झालेत. जे आहेत त्यांना कायम सेवेत घ्यावे, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल, असा इशारा दिला. यावर सभापती पाटील, शेखर इनामदार यांनी येत्या आठवड्यात पदाधिकारी, अधिकारी यांची  बैठक होईल, यात निश्चित असा मार्ग    काढू, अशी ग्वाही अजिंक्य पाटील यांनी दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली