शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली राष्ट्रवादी मुलाखतीतही स्वबळाचा नारा

By admin | Updated: August 26, 2014 22:54 IST

इच्छुकांची गर्दी : पलूस-कडेगाव वगळता सर्व मतदारसंघांसाठी मुलाखती

सांगली : मुंबईत राष्ट्रवादी भवनात मंगळवारी सांगली जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. पलूस-कडेगाव मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. शिराळ्याचे मानसिंगराव नाईक वगळता अन्य सर्व नेत्यांनी आज (मंगळवार) मुलाखतीला हजेरी लावली होती. मुलाखतीतही बहुतांश उमेदवारांनी आघाडीला विरोध दर्शवून स्वबळाचा मुद्दा मांडला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, विजयसिंह मोहिते-पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. सांगली विधानसभा मतदारसंघासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी नगरसेवक हरिदास पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आर. आर. पाटील व रमेश शेंडगे, खानापूर-आटपाडीतून अमरसिंह देशमुख व जतसाठी प्रभाकर जाधव, आकाराम मासाळ, रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, बसवराज पाटील यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीवेळी दावेदारी सांगतानाच इच्छुकांनी राष्ट्रवादी नेत्यांकडे स्वबळाचा मुद्दाही मांडला. पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी स्वबळाची घोषणा करावी, अशी मागणी बहुतांश इच्छुकांनी केली. याबाबत आ. मानसिंगराव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मतदारसंघात सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे मुलाखतीला जाता आले नाही. त्यासाठी दोन प्रतिनिधी व तालुकाध्यक्ष मुलाखतीसाठी गेले होते. राष्ट्रवादीकडूनच आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. कडेगाव-पलूस वगळता अन्य सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला आहे. काँग्रेसकडून सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी आणि जत या मतदारसंघातील इच्छुकांनी नुकत्याच मुंबईत मुलाखती दिल्या होत्या. काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने सात जागांसाठीच्या मुलाखती घेतल्या. (प्रतिनिधी)सांगली विधानसभा मतदारसंघात १९८५ पासून एक अपवाद वगळता, काँग्रेसला अपयश आल्याने ही जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घ्यावी, अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली. शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक मुलाखतीला अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.