शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून विश्वासघात केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्टला ‘स्वाभिमानी’च्यावतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी सांगितले.

शासनाने महापुरानंतर नुकसान झालेल्या जिरायत पिकाला ६८ रुपये, तर बारमाही बागायती पिकांना १३२ रुपये प्रतिगुंठा नुकसानभरपाई जाहीर करून पूूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोयीचे पुर्नवसन करावे. कृष्णा, वारणा नदीवर कमानी पूल बांधावेत, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि कर्ज माफ व्हावे. वीज बिलातील अवास्तव व्याज रद्द करावे, शेतकऱ्यांचे ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने मिळावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, जगन्नाथ मोरे, राम पाटील, बाळासाहेब जाधव, राजू माने, बाबा सांद्रे, आप्पासाहेब पाटील, शिवाजी मोरे, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, विक्रांत कबुरे उपस्थित होते.