शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या दाव्याने भाजप, सेनेचा गोंधळ

By admin | Updated: July 16, 2014 23:39 IST

विधानसभा निवडणूक : सांगली, कोल्हापूरमधील जागा घटणार

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही जागांसाठी आग्रही मागणी केल्यामुळे, जागांवरून आपसात भांडणाऱ्या भाजप, शिवसेनेच्या नेत्यांचा गोंधळ उडणार आहे. दोन्ही पक्षांना दोन्ही जिल्ह्यात आपल्या वाट्याच्या जागा अन्य घटकपक्षांना विशेषत: स्वाभिमानीला सोडाव्या लागण्याची चिन्हे दिसत आहेत. स्वाभिमानी आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी चार जागांची मागणी केली होती. महायुतीच्या जागावाटपात प्रत्यक्ष त्यांना दोनच जागा मिळाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्याकडे ६५ जागांचा प्रस्ताव नुकताच दिला होता. अर्थात शेट्टी यांनी पक्षामार्फत इतक्या जागांची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही त्यांनी कोकण वगळता अन्य सर्वच ठिकाणी संघटनेची ताकद असल्याचे सांगितल्यामुळे जादा जागांची मागणी त्यांच्याकडून होऊ शकते. आरपीआयनेही राज्यभर ठिकठिकाणी जागांसाठी दावेदारी करण्याची तयारी सुरू केली आहे. रासप व शिवसंग्राम पक्षालाही जागा द्याव्या लागतील, असे शेट्टी यांनी सांगितल्याने सेना व भाजपच्या वाट्याच्या जागा घटणार आहेत. घटकपक्षांना कोणत्या पक्षाच्या जागा द्यायच्या, याबाबतही निर्णय झालेला नाही. शेट्टी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही जागांसाठी आग्रह धरला आहे. या जागा नेमक्या कोणत्या आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. तरीही शिराळा व वाळव्याच्या जागेबाबत त्यांनी स्पष्टोक्ती दिली. कोल्हापुरातील शाहुवाडीच्या जागेची सदाभाऊ खोत यांच्यासाठी त्यांनी मागणी केली आहे. प्रत्यक्षात या जागेशिवाय अन्य काही कोल्हापूर जिल्ह्यातील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नेमक्या किती आणि कोणत्या जागा जाणार, याबाबतची चिंता आता भाजप, सेनेतील इच्छुकांना तसेच नेत्यांना सतावू लागली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पाच जागा लढविण्याचे घोषित केल्याने, भाजपची चिंता वाढली आहे. भाजपचे सांगली जिल्ह्यात तीन आमदार आहेत. या तिन्ही जागा मिळतील, असे त्यांनी गृहीत धरले आहे. या जागांशिवाय जिल्ह्यातील आणखी दोन जागांसाठी ते आग्रही आहेत. आठ जागा असताना, भाजप व सेनेने पाच जागांचा हट्ट धरला आहे. त्यातच ‘स्वाभिमानी’लाही याठिकाणच्या जागा हव्या आहेत. त्यामुळे महायुतीतच आता जागावाटपावरून गोंधळ होणार आहे. (प्रतिनिधी)तासगावसाठी रस्सीखेच जिल्ह्यातील आठ मतदार संघांपैकी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक ‘फेव्हरेट’ ठरत आहे. या मतदार संघासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. रस्सीखेच दोन्ही बाजूंनी नसून, तीन बाजूंनी होत आहे. परंपरेप्रमाणे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो, पण अजितराव घोरपडेंना पक्षात घेण्यासाठी भाजपला हा मतदारसंघ हवा आहे. दुसरीकडे ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते महेश खराडे यांनीही या जागेसाठी आग्रह धरला आहे.