शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याच्या सुशोभिकरणासाठी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

शिराळा : शिराळा नगरपंचायतीमार्फत माझी वसुंधरा अभियानअंतर्गत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू बनविल्या जाणार आहेत. शहरातील चौकात, प्रवेशद्वार आदी ठिकाणी विविध ...

शिराळा : शिराळा नगरपंचायतीमार्फत माझी वसुंधरा अभियानअंतर्गत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू बनविल्या जाणार आहेत. शहरातील चौकात, प्रवेशद्वार आदी ठिकाणी विविध प्लास्टिकच्या कचऱ्यातून शोभेचे पुतळे व कमानी बसविण्यात येणार आहेत. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल, अशी माहिती तहसीलदार तथा प्रशासक गणेश शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, माजी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक, विविध संस्था यांच्या सहकार्याने नो व्हेईकल डे, स्वच्छता अभियान आदी उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. शहरातील गोळा होणारा प्लास्टिक कचरा, लोखंडी सळया, पाण्याच्या बाटल्या गोळा करून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

ते म्हणाले, शहराच्या प्रवेशद्वारावर स्वागत फलक, विविध पुतळे, आयफेल टॉवर, हत्ती, नाग आदींचे प्लास्टिक पुतळे तयार करण्यात येणार आहेत. तसेच खराब टायरच्या माध्यमातून बसण्यासाठी स्टूल तयार करणे, नगरपंचायत इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वागत करणाऱ्या व्यक्तींचे पुतळे तयार करण्यात येणार आहेत. कचरा, लोखंडी सळया, बार, प्लास्टिक साहित्य, कागदी पुठ्ठे, टायर आदी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या वस्तूंमुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल.