शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उमराणीत शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:00 IST

जत : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उमराणी (ता. जत) येथील हनुमंत मल्लाप्पा गुंडी (वय ३०) या तरुण शेतकºयाचा ...

जत : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उमराणी (ता. जत) येथील हनुमंत मल्लाप्पा गुंडी (वय ३०) या तरुण शेतकºयाचा रविवारी सायंकाळी मृतदेह सापडला. उमराणीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर बिरूळ रस्त्यावर सदाशिव रेड्डी यांच्या शेतात हा मृतदेह आढळला. अनैतिक संबंधातून त्यांचा घातपात झाला आहे, असा आरोप मृत गुंडी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.मृत गुंडी यांच्या मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत विच्छेदन तपासणी सुरू होती. त्यामुळे मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यांचा खून झाल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. गुंडी हे आई, पत्नी, मुलासह उमराणीत एकत्रित राहत होते. ते शेती करीत होते. ट्रॅक्टरवर चालक म्हणूनही काम करीत होते. शुक्रवारी (दि. १) ते घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद लागत होता. ते नातेवाइकांकडे परगावी गेले असतील, असा विचार करून पत्नी व आईने त्यांचा शोध घेतला नाही.रविवारी सायंकाळी पाच वाजता सदाशिव रेड्डी यांच्या शेतात गुंडी यांचा मृतदेह आढळून आला. तेथील दुंडाप्पा बिरादार यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी जत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी गुंडी यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच गुंडी यांच्या पत्नी व आईने आक्रोश केला. अनैतिक संबंधातून त्यांचा खून झाल्याचा आरोप पत्नी व आईने केला आहे.उलटसुलट चर्चागुंडी यांनी आत्महत्या केली, का त्यांचा घातपात झाला आहे, याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला. रात्री उशिरापर्यंत विच्छेदन तपासणी सुरू होती. त्यामुळे गुंडी यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही.