शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
4
जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा अदानींनी त्यानंच बनवला रस्ता, पाहा डिटेल्स
5
MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
6
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
7
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
8
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
9
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
10
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
11
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
12
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
13
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
14
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
15
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
16
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
17
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
18
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
19
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
20
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

दहा कर्मचाऱ्यांचे आज निलंबन

By admin | Updated: December 23, 2014 00:37 IST

जि. प.ची कारवाई : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईबद्दलचा शासनाकडे अहवाल

सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी दोषी असून, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच दोषी आठ ते नऊ कर्मचाऱ्यांचा खुलासा आला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई मंगळवार, दि. २३ रोजी करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.गुरुवारी खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली होती. यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिलेची प्रवेशद्वारातच प्रसुती झाल्याचा आरोप मिरज पंचायत समिती सदस्यांनी केला होता. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधू पाटील यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सहायक राजू शेख, चंद्रकांत व्हनकंडे, सुनील कदम, आरोग्य सहाय्यिका यू. एस. चौगुले, औषध निर्माता कुमारी ए. व्ही. मालगावे, आरोग्य सेविका एस. यू. मुल्ला, एम. सुरेखा गोपाल, एम. बी. तांबे, शिपाई छाया पवार, श्रीमती एम. के. कराडे, श्रीमती के. वाय. कांबळे, श्रीमती बनसोडे, पुरुष परिचर ए. टी. हवालदार यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्या होत्या. डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसांचा खुलासा सोमवारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यांच्याकडून रात्री उशिरा जिल्हा परिषदेकडे अहवाल मिळाला आहे. यामध्ये एकूण बारा कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण दोषी नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांना कारवाईतून वगळण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहाजण दोषी दिसत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आहे. त्यानुसार आरोग्य सेवेत हालगर्जीपणा केल्याबद्दल आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सतीश लोखंडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हा परिषद पातळीवर असल्यामुळे आरोग्य सेवक, सेविका, शिपाई आदी आठ ते नऊजणांवर निलंबनाची कारवाई निश्चित केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून दबावतंत्र सुरू होते. (प्रतिनिधी)