शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई शक्य

By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST

खंडेराजुरीत प्रसुतीकडे दुर्लक्ष : ‘सीईओं’च्या निर्णयाकडे लक्ष

सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी आणि पाच आरोग्यसेविका व सेवकांना निलंबित का करू नये, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावली आहे. या सर्वांवर उद्या (सोमवारी) कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली होती. त्यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिलेची प्रवेशद्वारातच प्रसुती झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला होता. याप्रकरणी ताालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधू पाटील यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्याकडे अहवाल सादर केला. या अहवालाच्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे, आरोग्यसेविका सौ. एस. बी. तांबे, ई. एस. मुल्ला, एम. एस. पाटील, आरोग्यसेवक एम. एस. गोपाल यांच्यावर दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वांना खुलासा देण्याची मुदत उद्या, सोमवारी संपत आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)