शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे - संभाजी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:27 IST

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे

सांगली : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. या पोलिसांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांपासून भिडे यांना दोन पोलिसांचे संरक्षण होते. कोरेगाव-भीमा घटनेनंतर त्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. दिवस आणि रात्र अशा दोन सत्रात त्यांच्या सुरक्षेसाठी दहा पोलीस तैनात केले आहेत. २० एप्रिलला भिडे हे पहाटे साडेपाच वाजता एसटी बसने कामानिमित्त पुण्याला गेले होते. ही बाब रात्री कर्तव्यावर त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस हवालदार ए. के. कोळेकर, टी. बी. कुंभार, एस. ए. पाटील, व्ही. एस. पाटणकर व ए. एस. शेटे यांना समजली नाही. सकाळ सत्रातील सुरक्षेचे पाच पोलीस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.त्यानंतर या पाचही पोलिसांना शर्मा यांनी शुक्रवारी निलंबित केले. या कारवाईचे वृत्त समजताच भिडे यांनी तातडीने शर्मा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. ‘साहेब, आपण निलंबित केलेल्या पाच पोलिसांचा काहीच दोष नाही. त्यांचे निलंबन मागे घ्यावे’, अशी विनंती केली. तसेच ‘मला सुरक्षेची काही गरज नाही. मी कुठेही फिरत असतो, विनाकारण तुमच्या लोकांचे हाल होतात. माझ्या संरक्षणासाठी दिलेले हे पोलीस अन्य कामासाठी घ्यावेत’, असेही सांगितले. यावर शर्मा यांनी ‘ही खात्यांतर्गत बाब आहे. आमच्या लोकांची चूक असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली आहे’, असे त्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी