शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेच्या पंचायत समितीमध्ये निलंबित अधिकाऱ्याचा राबता

By admin | Updated: July 25, 2016 23:07 IST

पुनर्स्थापनेविरोधात ठराव : पदाधिकाऱ्यांनी दिला धक्का

मिरज : निलंबनाची कारवाई होऊनही मिरज पंचायत समितीच्या कार्यालयात राबता असणाऱ्या अधिकाऱ्यास पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दे-धक्का दिल्याने त्याची पंचाईत झाली आहे. निलंबित अधिकाऱ्याची मिरज पंचायत समिती कार्यालयाकडे पुनर्स्थापना करु नये, असा ठराव करण्यात आला आहे. असे असले तरी, या ठरावामुळे तरी संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयातील वावरास ब्रेक लागणार का? असा सवाल इतर त्रस्त कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. मिरज पंचायत समितीमधील एक अधिकारी दुसऱ्या तालुक्यातील एका प्रकरणावरुन निलंबित आहे. मात्र निलंबनापासूनही त्याचा मिरज पंचायत समितीच्या संबंधित विभागात वावर सुरूच आहे. निलंबित असताना संबंधित विभागात त्या अधिकाऱ्याच्या येण्याबद्दल पंचायत समितीत उलटसुलट चर्चा आहे. या अधिकाऱ्याचे विभागात येणे, कार्यालयातील साहित्याचा वापर करणे, कर्मचाऱ्यांशी गप्पा मारणे याचा त्रास सहन करावा लागत असल्याने, विभागातील काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केल्याची चर्चा आहे. मात्र वरिष्ठांनी, हा अधिकारी निलंबित असताना संबंधित कार्यालयात का येतो, याचा साधा जाबही विचारला नसल्याने, त्या निलंबित अधिकाऱ्याचा कार्यालयात राबता सुरुच होता. निलंबनाच्या कारवाईचा निकाल लागल्यानंतर, आपली मिरज पंचायत कार्यालयातच नेमणूक होणार असल्याची दबावाची भाषाही तो सहकाऱ्यांकडे बोलून दाखवत होता. अखेर ही तक्रार पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंत पोहोचल्याने, सदस्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन खात्री केली असता, संबंधित अधिकारी कार्यालयात वारंवार येत असल्याचे व गप्पा मारुन कामकाजात व्यत्यय आणत असल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला. पदाधिकाऱ्यांनी मासिक सभेत निलंबित अधिकाऱ्याची पंचायत समितीकडे पुनर्स्थापना करु नये, असा ठरावच घेतला आहे. (वार्ताहर)ठरावावेळीही अधिकारी हजर!पंचायत समितीच्या तहकूब मासिक सभेत सदस्य सतीश निळकंठ यांनी, या निलंबित अधिकाऱ्याची पंचायत समितीकडे पुन्हा पुनर्स्थापना करण्यात येऊ नये, असा ठराव मांडला. या ठरावाला सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले. सभागृहात ठराव होत असतानाही संबंधित अधिकारी पंचायत समितीच्या आवारात हजर होता. विरोधात ठराव झाल्याची माहिती मिळताच या अधिकाऱ्याचा चेहरा पडलेला दिसून आला.