शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!

By admin | Updated: June 7, 2017 00:22 IST

पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टा : आपण छत्रपतींचे नाव सांगतो आणि दोन-अडीच वर्षे सत्ता नाही, तर किती पळापळ सुरू केली आहे? तत्त्व व निष्ठेने वागणाऱ्यांचीच इतिहास गौरवपूर्ण नोंद ठेवत असतो. पळपुट्यांचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतला.नेर्ले (ता. वाळवा) येथील सदातात्या पाटील मळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या आमदार जयंत पाटील स्वागत कमानीचे उद्घाटन, तसेच राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले सदाशिव पाटील यांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी़ पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी दिलीपराव पाटील, नगरसेविका सौ़ अर्चना पाटील, अतुल पाटील, प्रज्वल कदम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जनार्दन पाटील, आप्पासाहेब माने, कऱ्हाडचे जगन्नाथ मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील, जि़ प़ सदस्या सौ़ संगीता पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संचालक आनंदराव पाटील, आप्पासाहेब कदम, जयसिंग पाटील, ग्रंथपाल संघटनेचे राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, जालिंदर पाटील उपस्थित होते. के़ एस़ पाटील यांनी स्वागत केले, ए़ टी़ पाटील यांनी प्रास्ताविक केले़ विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले़ शिवराज पाटील यांनी आभार मानले.हा माझा वडीलकीचा सल्ला... विलासकाका पाटील म्हणाले की, वैचारिक पाया खचल्यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांची मुले भाजपकडे पळत सुटली आहेत़ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी राज्यात एका बाजूला रचनात्मक काम करून लोकांचे जीवन समृध्द करतानाच, दुसऱ्या बाजूला बौध्दिक शिबिरे घेऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली़ पुन्हा एकदा बौध्दिक शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडविण्याचे काम आपणाला सुरू करावे लागेल. जयंतरावांनी हे काम हाती घ्यावे, हा माझा वडीलकीचा सल्ला आहे़