शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू

By admin | Updated: April 26, 2016 00:24 IST

महापालिकेची कार्यवाही : दोनशे कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त

सांगली : महापालिकेने शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाची मोहीम सोमवारपासून हाती घेतली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील २५ भागात ही मोहीम राबविली जात आहे. दोन आठवड्यापूर्वी महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, आयुक्त अजिज कारचे यांच्यासह नगरसेवकांची बैठक झाली होती. या बैठकीत पालिकेच्या विविध करांचा आढावा घेण्यात आला. महापौर शिकलगार व गटनेते जामदार यांनी मालमत्तांच्या सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. शहरातील उपनगरांत मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. पण त्यांची महापालिकेकडे नोंदच नाही. गावठाणातही अनेकांनी वाढीव बांधकाम केले आहे. पण त्यांना जुन्याच दराने घरपट्टी आकारली जात आहे. घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. नव्याने सर्वेक्षण केल्यास ३० हजारहून अधिक मालमत्ता रेकॉर्डवर येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार गेले पंधरा दिवस घरपट्टी विभागाकडून नियोजन केले जात होते. या सर्वेक्षणासाठी २१९ जणांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात आदेश देण्यात आले. सोमवारपासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील ५६ भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सोमवारी एकूण २५ भागात ही मोहीम हाती घेतली. या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी चार सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज किमान शंभर ते दीडशे घरांचा सर्व्हे केला जाणार आहे. यात बांधकाम परवाना, गुंठेवारी प्रमाणपत्र आहे का?, परवान्यापेक्षा जादा बांधकाम, घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छतागृहाचा सर्व्हे होणार आहे. सोमवारी सकाळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)