---------------
भाजी विक्रेते संकटात
सांगली : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या अनुषंगाने केलेल्या वेळेच्या बंधनाच्या सक्तीने भाजीविक्रेते पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेतच भाजी विकली जात आहे; मात्र नाशवंत असल्यामुळे ही भाजी वाया जात आहे. त्यामुळे विक्रीही कमी आणि भाजीचेही नुकसान अशा दुहेरी कात्रीत भाजी विक्रेते अडकले आहेत.
-------------
मशागतीची पूर्वतयारी
शिराळा : तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या भातशेतीच्या मशागतीच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात होणार आहे. शेतकरी या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या पेरणीकडे लक्ष देऊ लागले आहेत.
--------------
हॉटेल्स बंदमुळे गैरसोय
मिरज : लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अनिश्चित काळासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आली आहेत; मात्र सध्या रुग्णालयांच्या परिसरात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र हॉटेल्स बंद असल्याने त्यांना खाण्याचे पदार्थ मिळताना अडचण येत असल्याने काहीवेळा उपासमार होत आहे.