शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुरेश खाडे यांचे जल्लोषी स्वागत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:39 IST

मिरज : सामाजिक न्यायमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे रविवारी मिरजेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी ...

मिरज : सामाजिक न्यायमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे रविवारी मिरजेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व वाद्यांच्या तालावर रंगलेल्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भर पावसात मिरवणूक काढण्यात आली होती.मिरजेत सांयकाळी ७ वाजता खाडे यांचे आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खाडे यांचा ताफा महात्मा गांधी चौकात आला. गांधी चौकातून वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीस सुरुवात झाली.मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांतर्फे स्वागत व अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. मिरवणूक सुरु असताना पावसाने हजेरी लावली. मिरवणुकीत हिंदी चित्रपटगीतांच्या तालावर पावसातही कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु होते. शिवाजी पुतळा, गणेश तलाव, शनिवार पेठ, श्रीकांत चौक, किसान चौक, येथे खाडे यांचे मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून खाडे यांची तीन तास मिरवणूक सुरु होती. खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे व कुटुंबीय मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरजेतील खाडे यांच्या कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.महापौर संगीता खोत, नगरसेविका अनिता व्हनखंडे, मोहन व्हनखंडे, शिवाजी दुर्वे, पांडुरंग कोरे, संदीप आवटी, निरंजन आवटी, ओकार शुक्ल, दिगंबर जाधव, सुरेश आवटी, तानाजी घारगे, सचिन चौगुले, राजा देसाई, शीतल पाटोळे, नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाने, गजेंद्र कुल्लोळी, गायत्री कुळ्ळोळी, के. के. काझी, असगर शरीकमसलत सहभागी झाले होते. खाडे यांच्या कार्यालयासमोर मिरजकर नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मिरजकर नागरिकांचे प्रेम व आशीर्वाद यामुळे माझी मंत्रीपदी निवड झाली आहे. या पदाचा उपयोग गरिबांच्या सेवेसाठी, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करेन, अशी ग्वाही खाडे यांनी यावेळी दिली.आईकडून झालेल्या कौतुकाने भारावले खाडेसांगलीवाडी टोलनाक्याजवळ रविवारी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या आई तानुबाई यांनी मुलास आलिंगन देत कौतुक केले, तेव्हा खाडे यांच्यासह कार्यकर्तेही भावूक झाले होते. त्यानंतर खाडे यांचे टिळक चौकात स्वागत करण्यात आले. गणपती मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर टिळक स्मारक मंदिरात त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, प्रकाशतात्या बिरजे, बजरंग पाटील, महापालिकेचे सभागृह नेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते. त्यानंतर मिरवणुकीने ते महापालिकेजवळ आल्यानंतर काही नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले.पाचशे किलोचा हारमिरजेतील शिवाजी चौकात सुरेश आवटी युवा मंचतर्फे खाडे यांना क्रेनच्या साहाय्याने भलामोठा फुलांचा हार घालण्यात आला. हा हार तयार करण्यासाठी सुमारे पाचशे किलो फुलांचा वापर करण्यात आला होता. हा फुलांचा हार मिरवणुकीत लक्षवेधी ठरला. कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ््यांचा कडकडाट केला. तब्बल ५० वर्षांनंतर मिरजेला मंत्रीपद मिळाल्याने गेले आठवडाभर भाजप कार्यकर्त्यांकडून खाडे यांच्या स्वागताची तयारी सुरु होती.