शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालगावमध्ये सुरेश खाडे यांना गावबंदीचा निर्णय

By admin | Updated: February 11, 2016 00:32 IST

गरामसभेत ठराव : ‘म्हैसाळ’ पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध

मालगाव : म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे आ. सुरेश खाडे यांच्या भूमिकेवर मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामसभेत हल्लाबोल करण्यात आला. पूर्वभागातील जनतेला वाऱ्यावर सोडत पाणीप्रश्नी सोयीची भूमिका घेणाऱ्या आमदारांना गावबंदी करण्याच्या मागणीचा ठराव घेण्यासही संतप्त ग्रामस्थांनी भाग पाडले.मालगाव येथील प्रजासत्ताकदिनी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा सरपंच प्रशांत माळी यांच्या अध्यक्षतेखाली व जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, उपसरपंच शशिकांत कनवाडे, गटनेते प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडली. ग्रामसभा म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावरुन गाजली. राज्य शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे योजनेचे आवर्तन लांबल्याने पाण्याच्या भरवशावर उभ्या केलेल्या द्राक्ष, केळी, डाळिंबबागा, पानमळे उद्ध्वस्त होत आहेत. अशा बिकटप्रसंगी मिरजेचे आमदार सुरेश खाडे नेमके आहेत तरी कोठे, असा संतप्त सवाल सभेत करण्यात आला. निवडणुकांत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून देऊ, असे सांगणारे आ. खाडे यांच्या पक्षाच्या शासनाने शेतकऱ्यांच्या सात-बारावर म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा बोजा चढवला. आ. खाडे यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, शेतकरी संघटनेचे संजय खोलकुंबे, महेश सकपाळ, विजय खोलकुंबे, बाबासाहेब पाटील व भास्कर भंडारे यांनी, म्हैसाळ योजनेचे पाणी सुटेपर्यंत आ. खाडे यांना गावबंदी करण्याची मागणी केली. या मागणीवर एकवटलेल्या ग्रामस्थांनी गावबंदीचा तसा ठराव करण्यास भाग पाडले. सभेत आ. खाडे यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचे प्रभागात समान वाटप करण्याची मागणी अरुण धामणे यांनी केली. पूर्वीची कर आकारणी रद्द होऊन, शासन आदेशानुसार भांडवली मूल्यांकनावर आधारित घरपट्टी वसुली पध्दत राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मनोहर धेंडे यांनी सांगितले. सभेस ग्रामपंचायत सदस्य राजू भानुसे, सतीश बागणे, अशोक सावळे, विलास होनमोरे, अस्लम मुजावर, महाबुबी मुजावर, मंगल खांडेकर, रुपाली माळी, लता जत्ते, स्मिता कुंभारकर, अनिता माळी, सुरेखा कुंभार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)